शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीवापर संस्थांचा कालबद्ध कार्यक्रम राबवा

By admin | Updated: March 17, 2016 00:17 IST

मराठवाड्यातील लातूर शहरात सुमारे २५ दिवसाला एकदा पिण्याचे पाणी येते. शहरात १८०० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.

जिल्हाधिकारी : जलजागृती सप्ताहाचा शुभारंभअमरावती : मराठवाड्यातील लातूर शहरात सुमारे २५ दिवसाला एकदा पिण्याचे पाणी येते. शहरात १८०० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शहरातील रिक्षाच्या संख्येपेक्षाही पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या अधिक आहे. अशी भीषण स्थिती आपल्याकडे येणार नाही असे कोणी ठामपणे सांगू शकत नाही यासाठी पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे. जलयुक्त शिवारसाठी निवडण्यात आलेल्या गावांपैकी ३-४ गावासाठी एक पाणी वापर संस्था स्थापन करावी व अशा संस्थांवर पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी द्यावी. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सदुपयोग करुन घेण्यासाठी कृषि विभागाने पाणी वापर संस्थांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी दिले.जिल्ह्यात १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बचत भवनमध्ये जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्पाचे पाणी कलशमध्ये आणण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता र.प्र.लांडेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता घाणेकर, पोहेकर, उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी उपस्थित होते.गीत्ते म्हणाले, येणाऱ्या काळात शेतीला कालव्याद्वारे पाणी पुरवठा करण्याऐवजी पाईप लाईनने पाणी देण्याचा शासन विचार करत आहे. पाईप लाईनद्वारे पाणी दिल्यास उत्पादन क्षमता ४० वरुन ८०-९० टक्के पर्यंत कार्यक्षमता वाढते. जिल्ह्यात ठिबक, तुषार मोहिम राबविण्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर झाले आहे. यावर २५ टक्के सबसिडी असून मोठ्या प्रमाणावर आॅनलाईन अर्ज प्राप्त आहे. जलसंपदा विभाग पाण्याची साठवणूक जरी करत असेल तरी पाण्याचा खरा ग्राहक कृषि विभाग आहे. या विभागाचा शेतकऱ्यांवर अधिक प्रभाव आहे यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा.अशी सूचना देखिल जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.