शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
3
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
4
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
5
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
6
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
7
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
8
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
9
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
10
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
11
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
12
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
13
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
14
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
15
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
16
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
17
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
18
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
19
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
20
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले

परप्रांतातील मजुरांवर शेतकऱ्यांची मदार

By admin | Updated: December 16, 2015 00:24 IST

बळीराजा आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी खचला आहे. लोकप्रतिनिधी किंवा विविध पक्षांच्या आश्वासनांवरून त्यांचा विश्वास उडाला आहे, ...

अचलपूर : बळीराजा आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी खचला आहे. लोकप्रतिनिधी किंवा विविध पक्षांच्या आश्वासनांवरून त्यांचा विश्वास उडाला आहे, अशी शेतकऱ्यांची स्थिती असताना शेतमजुरांच्या रूपाने त्यांचेसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. परप्रांतीय शेतमजुरांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांनाही सुगीचे दिवस आले आहे. अचलपूर तालुक्यात काही प्रमाणात नौकरदार वर्ग असला तरी येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. तालुक्याचे ६४६३०.५ हेक्टर क्षेत्रफळ आहे. शेती ५४११६ हेक्टरमध्ये केली जाते. बहुसंख्य शेतकरी सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके घेतो. संत्रा उत्पादक शेतकरी मृगबहराची व आंबा बहराची संत्रा पिके घेतो. भाजीपाल्याचेही उत्पादन अल्प शेतकरी घेत असतात. केळीचीही लागवड केली आहे. कपाशी हे पीक मोठ्या कालावधीचे व जास्त मजुरांचे आहे. पण कापूस वेचायला मजूर मिळणे कठीण झाले आहे. मजूर मिळाले तर कापूस वेचण्याचे दर ६ ते ८ रुपयांपर्यंत मागतात. त्यामुळे प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलाही शेतात कापूस वेचायला जाताना दिसतात. बाजारात कापसाला चांगला भाव नाही. त्यामुळे कापूस उत्पादक हैराण झाले आहेत.शेतात कापूस मोठ्या प्रमाणात निघाला आहे. परंतु प्रत्येक कापूस उत्पादकांची हीच परिस्थिती असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मजूर मिळणे कठीण झाले आहे. हल्ली शासनातर्फे दारिद्र्यरेषेखालील लोकांना कमी भावाने शिधापत्रिकेवर मोठ्या प्रमाणात गहू, तांदूळ मिळत असल्यामुळे बहुसंख्य कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. घराघरांत ५ ते ६ व्यक्ती असले तरी प्रत्यक्ष काम २ ते ३ व्यक्ती करत आहे. कुटुंबाचे आरोग्य कपडे, अन्न, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आणि घर या आवश्यक गरजा भागविण्यासाठी पूर्वी कुटुंबातील प्रत्येक सदस्य मिळेल ते काम करत होता. आता त्यांचेसाठी शासकीय योजनांचा पूर आला आहे. कोणतेही कष्ट न करता या योजना लाटून नंतर विकून मौजमजा करीत प्रसंगी वरली मटक्याच्या टपरीवर रिकामा दिवस घालविण्याची मानसिकता ग्रामीण भागात वाढत आहे. याचा थेट परिणाम शेती व्यवसायावर झाला आहे. शेतात मजूर मिळत नाही, महिनेवारी येण्याचे दिवस आता संपले आहेत, मजूर मनमानी मजुरी मागतात ते काम दिवसातून २-४ तासांत उरकवून दुप्पट-तिप्पट मजुरी प्राप्त करतात. कमी वेळात थोड्या श्रमात भरपूर पैसा मिळत असल्याने ग्रामीण भागातील मजूर वर्गात व्यसनाधिनता वाढत असल्याचे दिसते. घरात खायला धान्य नाही, रहायला साधे घर नाही. परंतु मोटारसायकल, महागडे मोबाईल, गुटख्याच्या पुड्या, दारू या बाबी साध्या मजुराजवळही सर्रास आढळतात. इतर गरजा राज्य सरकार पुरवीत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी व खऱ्या कष्टकऱ्यांची गोची होत जाते. कोणी कामावर यायला तयार झाल्यास तो म्हणेल ती मजुरी व तो म्हणेल तेच काम, इतकेच नव्हे तर तो म्हणेल तेवढाच वेळ मान्य करावा लागतो त्यामुळे मजुराच्या मदतीशिवाय कोणते पीक येईल याचा विचार शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कधीकाळी समृध्द असलेल्या ग्रामीण भाग विविध योजनांमुळे व्यवसाधीन व दरिद्री होत असल्याचे दिसत आहे.