शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

१.२४ कोटी जीएसटी भरा, अमरावती विद्यापीठाला नोटीस

By गणेश वासनिक | Updated: June 2, 2024 20:49 IST

विद्यार्थी संलग्नीकरण शुल्कावर १८ टक्के जीएसटी आकारणी, २०१७ ते २०२४ यादरम्यान आठ वर्षांतील रक्कम थकबाकी

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे संलग्नीकरण शुल्कापोटी (ॲफिलेशन फी) १ कोटी २४ लाखांच्या जीएसटीची रक्कम थकीत आहे. त्यामुळे नागपूर येथील जीएसटी कौन्सिलने विद्यापीठाला नोटीस बजावून थकीत रकमेचा भरणा करावा, असे निर्देशित केले आहे. विद्यार्थी संलग्नीकरण शुल्कावर जीएसटी आकारणी होत असल्याने प्रशासन गाेंधळून गेले आहे.

नागपूर येथील वस्तू व सेवाकर (जीएसटी) कार्यालयाने वर्ष २०१७ ते २०२४ या दरम्यान विद्यार्थी संलग्नीकरण शुल्कापोटी जीएसटी थकीत असल्याप्रकरणी अमरावती विद्यापीठाला नोटीस बजावून त्वरेने ही रक्कम अदा करावी, अन्यथा कायदेशीर कारवाईच्या सामोरे जावे लागेल, असे कळविले आहे. जीएसटीची नोटीस आल्यामुळे हा प्रश्न व्यवस्थापन परिषदेच्या पुढ्यात नेण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.

विद्यार्थी संलग्नीकरण शुल्क हे व्यावसायिक नसून या शुल्कातूनच विद्यापीठाचा कारभार चालतो, असा पद्धतीने जीएसटी कौन्सिलसमोर जाण्याची तयारी प्रशासनाने आखली आहे. तत्पूर्वी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य याविषयी कोणता निर्णय घेतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे. १८ टक्के जीएसटी आकारणी करण्यात आल्यामुळे विद्यापीठात संलग्नीकरण शुल्क जणू व्यावसायिकीकरण झाले तर नाही ना, असाच काहीसा समज निर्माण झाला आहे.जीएसटी कौन्सिलकडे दाद मागू: प्रभारी कुलसचिवविद्यापीठात विद्यार्थी संलग्नीकरण शुल्क हा व्यावसाय नाही. हे अगोदर जीएसटी कौन्सिलला पटवून द्यावे लागेल. विद्यापीठ अभ्यासक्रमांना ॲफिलेशन देते म्हणजे नफा कमावितात, असा विषय नाही. विद्यार्थी शुल्कातूनच विद्यापीठाचा कारभार चालतो, अशा अनेक बाबी अपील दाखल करून जीएसटीच्या निदर्शनास आणून दिल्या जातील. जीएसटीची नोटीस आली, त्यावर उत्तर देखील दिले जाईल, यातून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती प्रभारी कुलसचिव मंगेश वरखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जीएसटी कार्यालयाने २०१७ ते २०२४ या कालावधीत संलग्नीकरण शुल्काचे जीएसटी थकीत असल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. १८ टक्क्याने जीएसटी आकारणी केली आहे. १ कोटी २४ लाख रुपयांची ही नोटीस असली तरी कायदेशीर उत्तर दिले जाणार आहे.- डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखाधिकारी, विद्यापीठ 

टॅग्स :GSTजीएसटी