शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

राज्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासन सांगत असले तरी या बैठकीला उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथे डॉक्टर, स्टाफ, साहित्य नसल्याचे बैठकीत स्पष्ट केले होते. तरीही हायरिस्क लोकांना या डेडिकेटेड रुग्णालयात प्रशासनाने हलविले. या बैठकीदरम्यान तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर पाठविण्याबाबत प्रशासनाला आश्वस्त केले.

ठळक मुद्देडॉक्टर अन् स्टाफ नाही : ४० बेडला २४ बेडशिट; प्रकाश व्यवस्थाही नाही

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये हायरिस्क नागरिकांना क्वारंटाईन केले जात आहे. या रुग्णांची हेळसांड होत आहे. शहरातील ६० वर्षीय महिला कोरोना पॉझीटिव्ह आल्यानंतर हायरिस्क १५ लोकांना रविवारी प्रशासनाने येथे क्वारंटाईन केले. यात त्यांना धड बेडशिटही मिळू शकल्या नाहीत.राज्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासन सांगत असले तरी या बैठकीला उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथे डॉक्टर, स्टाफ, साहित्य नसल्याचे बैठकीत स्पष्ट केले होते. तरीही हायरिस्क लोकांना या डेडिकेटेड रुग्णालयात प्रशासनाने हलविले. या बैठकीदरम्यान तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर पाठविण्याबाबत प्रशासनाला आश्वस्त केले. पण, पहिल्या दिवशी रविवारी त्यांच्याकडून पोहोचला नाही. डॉक्टराविनाच ते लोक त्या ठिकाणी तसेच रात्रभर पडून होते. या हॉस्पिटलमध्ये ४० बेड देण्यात आले. या ४० बेडला आवश्यक असणाऱ्या साध्या बेडशिटही या ठिकाणी उपलब्ध नाहीत. ४० बेडकरिता २४ बेडशिट्स देण्यात आल्या आहेत. १५ हायरिस्क व्यक्ती दाखल करण्यात आल्या त्यावेळी १५ बेडवर १५ बेडशिट्स टाकल्या गेल्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी या बेडशिट बदलविण्याचा प्रयत्न केला असता, त्या अपुºया पडल्या. या बेडशिट्स स्वच्छ करण्याची, धुण्याचीही व्यवस्था त्या ठिकाणी नाही, यातच सारे आले.डेडिकेडेट कोविड रुग्णालयाला सोमवारी दोन डॉक्टर रुजू झाले. रुग्णांची हेळसांड आम्ही होऊ देणार नाही. आवश्यक सुविधांसह साहित्य उपलब्ध करून देणाचा आमचा प्रयत्न आहे.- डॉ. सरवत वर्मा, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूरसाधी मेणबत्तीही नाहीहॉस्पिटलमध्ये वीज गेल्यानंतर कुठलीही पर्यायी व्यवस्था नाही. जनरेटर नाही, इन्व्हर्टर नाही, साधी मेणबत्तीही त्या ठिकाणी उपलब्ध नाही. या हॉस्पिटलमध्ये फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. येथे नागरिकांनाच नव्हे तर रुग्णांनाही आत प्रवेश नाही. तपासणी करून घेण्याकरिता आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्याकरिता तासन्तास उन्हात बाहेर उघड्यावर रांगेत उभे राहावे लागते. उन्ह आणि पावसापासून त्यांचे संरक्षण करण्याकरिता कुठलेही शेड प्रशासनाने उभारलेले नाही. साधी बसण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही त्या ठिकाणी नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या