शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

पाटी ‘कोरी’, उद्ध्वस्त आयुष्याला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:01 IST

विकासात आदिवासी मुले कुठे आहेत, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कामाच्या निमित्ताने स्थलांतरित मेळघाटातील आदिवासी बांधवांची मुले हे वीटभट्ट्यांवर काम करीत आहे. अमरावतीला लगतच्या कोेंडेश्वर तसेच अंजनगाव बारी मार्गावर  ५० ते ६०  वीटभट्ट्या असून या परिसरात शेकडो आदिवासी मुले बाल मजूर म्हणून राबताहेत. त्यामुळे ही मुले  शिक्षण, हक्क, अधिकारांपासून वंचित  असून त्यांच्या उद्ध्वस्त आयुष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

उज्वल भालेकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ज्या वयात हाती पाटी असावी, अक्षरे गिरवावी, नेमके त्याच वयात आदिवासी मुलांच्या नशिबी फार वेगळे चित्र आले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मेळघाटातून स्थलांतरित आदिवासी कुटुंब अमरावती शहरासह लगतच्या वीटभट्ट्यांवर मुलांसह कष्ट करीत असल्याचे विदारक दृश्य आहे. त्यामुळे आदिवासी मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या उद्ध्वस्त भविष्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशाचे भविष्य हे येणाऱ्या नव्या पिढीच्या हाती असून देश विकासाकडे वाटचाल करीत आहे. अशा ‘ राजकीय’ भूलथापा नित्याचीच बाब आहे. मात्र, या विकासात आदिवासी मुले कुठे आहेत, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कामाच्या निमित्ताने स्थलांतरित मेळघाटातील आदिवासी बांधवांची मुले हे वीटभट्ट्यांवर काम करीत आहे. अमरावतीला लगतच्या कोेंडेश्वर तसेच अंजनगाव बारी मार्गावर  ५० ते ६०  वीटभट्ट्या असून या परिसरात शेकडो आदिवासी मुले बाल मजूर म्हणून राबताहेत. त्यामुळे ही मुले  शिक्षण, हक्क, अधिकारांपासून वंचित  असून त्यांच्या उद्ध्वस्त आयुष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.रोजगार नसल्याने स्थलांतरमेळघाटात रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध नसल्याने अनेक आदिवासी हे कुटुंबासह वास्तव्यास राहतात. कोंंडेश्वर तसेच अंजनगाव बारी मार्गावरील वीटभट्ट्यांवर अनेक आदिवासी कुटुंब काम करीत आहे. ही संख्या हजारात आहेत. यात काही आदिवासी महिला गर्भवती तर काही स्तनदा माता देखील आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.  

मेळघाटातील आरोग्य सेवा पुरवणे कठीण मेळघाटात आदिवासी बांधवांकरिता अनेक आरोग्य योजना राबविल्या जातात. या योजना मेळघाटातील स्थलांतरित आदिवासींसाठी राबविणे कठीण होते. सध्या वीटभट्टी परिसरात असलेल्या गर्भवती, स्तनदा माता तसेच बालकांचा संदर्भात अंजनगाव बारी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत.- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

५२० लाभार्थींपर्यंत पोहचविला लाभएकात्मिक बाल विकास सेवा योजना, अमरावती ग्रामीण विभागांतर्गत वीटभट्टी परिसरातील ५२० लाभार्थींपर्यंत योजनेचा लाभ पोहचविण्यात आला. यामध्ये तीन वर्षांखालील २०७, सहा वर्षांखालील २७५ मुले तसेच ३८ गरोदर व स्तनदा माता आहेत. यात गहू, हरभरा, मूग डाळ, साखर, हळद, मिरची, मीठ असे किराणा साहित्याचा समावेश आहे.- विलास दुर्गे, बाल विकास प्रकल्प अधिकारी

दोन बालकामगार रोखलेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे बालकामगार विरोधी धाडसत्र राबविण्यात आले नाही. गतवर्षी जिल्ह्यात एकूण पाच धाडसत्र राबविले. यामध्ये तीन बालकामगारांची सुटका करण्यात आली. कोंडेश्वर मार्गावरील वीटभट्ट्यांवर दोन बालकामगारांचे शोषण रोखून योग्य ती कारवाई केली आहे. बालकामगार असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करू. - राहुल काळे, सरकारी कामगार अधिकारी

 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण