अंजनगाव सुर्जी : पतंजली व लोकजागर परिवारच्यावतीने कोरोनायोद्धे पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संगीता मेन यांनी सहायक पोलीस निरीक्षक विशाल पोळकर, उपनिरीक्षक इम्रान इनामदार व सहायक निरीक्षक चंद्रकला मेसरे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कविता नागोरे, मंजली ठाकरे, दयाराम लामगे, अजय नंद, किशोर घुगे, सुनील चव्हाण, विनोद मोरे, सूर्यकांत लांडे, नरेश कासदेकर, विजय शेवतकर, कुंदन सातपुते, अर्चना इंगळे, सुनीता तायडे, किरण दहीवडे, भूषण तायवाडे, पंकज निलकंडे, मिलिंद ढोके, श्रीकांत राठोड, विश्वनाथ राठोड, राजेश जांभेकर, विजय निलकंडे, युवराज श्रीनिवास, शिवपाल दाबेराव, भुरेलाल जांभेकर, अमित घाठे, रूपलाल नाकतोडे, ज्ञानेश्वर चव्हाण आदींना सन्मानित करण्यात आले. संचालन प्रमोद निपाणे यांनी केले. संजय धारस्कर, नाना शिंदीजामेकर, नीता मोगरे, छाया बागडे, चंद्रकांत गुलवाडे व जयेश ढोकणे यांनी विशेष सहकार्य केले.
.