परतवाडा डेपोत अडीच वर्षांपासून प्रवासी उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:53+5:302021-06-20T04:09:53+5:30

(लोकमत विशेष) फोटो पी १९ परतवाडा पोलीस चौकी बंद, हिरकणी कक्ष गायब, प्रवासी नव्या इमारतीच्या प्रतीक्षेत अनिल कडू परतवाडा ...

The passenger depot has been open for two and a half years | परतवाडा डेपोत अडीच वर्षांपासून प्रवासी उघड्यावर

परतवाडा डेपोत अडीच वर्षांपासून प्रवासी उघड्यावर

googlenewsNext

(लोकमत विशेष)

फोटो पी १९ परतवाडा

पोलीस चौकी बंद, हिरकणी कक्ष गायब, प्रवासी नव्या इमारतीच्या प्रतीक्षेत

अनिल कडू

परतवाडा : परतवाडा एसटी डेपोत अडीच वर्षांपासून प्रवासी उघड्यावर आहेत. या बस स्थानकावरील पोलीस चौकी कुलूपबंद आहे. हिरकणी कक्ष गायब आहे. मजबूत अशी पोस्टाची उभी लोखंडी पत्रपेटी चोरीला गेली आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत, अमरावती विभागातील परतवाडा बसस्थानकाची व डेपोची एक वेगळी ओळख आहे. या महत्त्वपूर्ण बसस्थानकाहून दररोज एसटी बसचे शेकडो शेड्युल, राज्यातील विविध शहरांसह मध्यप्रदेशात ये-जा करतात. मेळघाटातील आदिवासीबहुल क्षेत्रात प्रवाशांची ने-आण करतात. याच अनुषंगाने परतवाडा बसस्थानकाचे नूतनीकरण व दर्जावाढ करण्याकरिता कोट्यवधी रुपयांच्या अपेक्षित खर्चाचे काम मंजूर केल्या गेले. या कामाचे भूमिपूजन २१ जुलै २०१८ रोजी पार पडले. भूमिपूजनानंतर, जुने काम पाडून नव्या कामास सुरुवात केल्या गेली. काम सुरू होताच बसस्थानकाच्या जुन्या लुकला चढवल्या जाणाऱ्या नव्या लूकची चर्चा सुरू झाली. यात बस स्थानकाच्या दर्शनी भागात सुंदरशा गार्डन आणि या गार्डनच्या मध्यभागातून पेव्हिंग ब्लॉक वरून सरळ बसस्थानकात प्रवेश दाखवल्या गेला.

उद्यान मोडकळीस

तीन वर्षांत या गार्डनमध्ये साधे तुळशीचे रोपही लावले गेले नाही. प्रवेश मार्गाच्या छतावरील भल्यामोठ्या लोखंडी टोपीला काचही बसवले गेले नाहीत. या मार्गातील बस स्थानकाच्या मुख्य इमारतीला लागून असलेला इतिहासकालीन लाकडी दुमजली पान खोका जो वर्षानुवर्षे बंद आहे, तो काढला गेलेला नाही. हा प्रवेश मार्ग प्रवाशांनकरिता खुला नाही. या परिसराची झाडझुडही नाही.

बॉक्स २

प्राथमिक सुविधांची मारामार

जुनी इमारत पाडून उभारल्या गेलेल्या खुल्या गोलाकार इमारतीत प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नाही. प्रकाश व्यवस्था नाही. कोट्यवधींचा खर्च होऊनही योग्य अशी सांडपाण्याची व्यवस्था नाही. वर्षांनुवर्षे चोकअप होणाऱ्या मुतारी आणि संडासच्या पाईपलाईनची समस्या निकाली निघालेली नाही. योग्य अशा सुरक्षित ठिकाणी प्रवाशांकरिता पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही.

Web Title: The passenger depot has been open for two and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.