लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक मॉडेल रेल्वे स्थानकावरून नागपूरकरिता मेमू पॅसेंजर सोमवारपासून प्रारंभ झाली. आसन व्यवस्था अद्ययावत असल्यामुळे प्रवाशांची या रेल्वे गाडीला पसंती दिसून येते. अमरावती रेल्वे स्थानकाहून दुपारी ३.१० वाजता ती नागपूरकडे दररोज रवाना होत आहे. ही गाडी बडनेऱ्याला न आणता थेट कॉड लाइनहून नागपूरकडे पाठविली जात असल्याची माहिती रेल्वे स्थानक प्रबंधक महेंद्र लोहकरे यांनी दिली.‘मॉडिफाइड मल्टिपल युनिट’ अशा अद्ययावत प्रणालीवर मेमू रेल्वे गाडी तयार करण्यात आली आहे. मुंबईत चालणाºया लोकलच्या धर्तीवर ही पॅसेंजर धावत आहे. आसन व्यवस्था सुटसुटीत असल्याने प्रवाशांना ये- जा करताना त्रास होत नाही. चेअर कार आसन व्यवस्थेमुळे प्रवाशांनी त्याचे स्वागतच केले आहे. दिवसातून एकदाच ही गाडी अमरावती-नागपूर दरम्यान सोडली जाते. नवा लूक घेऊन आलेल्या मेमू गाडीला बघण्यासाठी सोमवारी रेल्वे स्थानकावर बघ्यांनी गर्दी केली होती. १६ डब्यांच्या या मेमू पॅसेंजरमध्ये १२ डब्यात प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अमरावती-नागपूर दरम्यान सर्वच रेल्वे स्थानकांवर थांबा असल्यामुळे गाव-खेड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, बडनेरा रेल्वे स्थानकाला वगळण्यात आल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.इंटरसिटी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करामाजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात अमरावती-नागपूर दरम्यान सुरू झालेली इंटरसिटी एक्स्प्रेस ही मॉडेल रेल्वे स्थानकावरून पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी रवाना होते. मात्र, ही सोयीची वेळ नाही. नागपूरकडे जाणाºया प्रवाशांनी ही वेळ सकाळी ६ किंवा पुढे ६.३० वाजता करावी, अशी मागणी केली आहे.
अमरावती-नागपूर दरम्यान पॅसेंजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST
‘मॉडिफाइड मल्टिपल युनिट’ अशा अद्ययावत प्रणालीवर मेमू रेल्वे गाडी तयार करण्यात आली आहे. मुंबईत चालणाºया लोकलच्या धर्तीवर ही पॅसेंजर धावत आहे. आसन व्यवस्था सुटसुटीत असल्याने प्रवाशांना ये- जा करताना त्रास होत नाही. चेअर कार आसन व्यवस्थेमुळे प्रवाशांनी त्याचे स्वागतच केले आहे. दिवसातून एकदाच ही गाडी अमरावती-नागपूर दरम्यान सोडली जाते.
अमरावती-नागपूर दरम्यान पॅसेंजर
ठळक मुद्देरेल्वे गाडीला नवा लूक : चेअर कार, १६ डब्यांच्या गाडीला प्रवाशांची पसंती