लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक (प्रॅटिकल) परीक्षांमध्ये कागदोपत्री खानापूर्तीला लगाम बसणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा ही वास्तविकपणे व्हावी, यासाठी विद्यापीठाकडून स्वतंत्र पथक गठीत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने परीक्षा विभागाने तयारी चालविली आहे.विद्यापीठ अंतर्गत ३८३ संलग्नित महाविद्यालये आहे. मात्र, दरवर्षी हिवाळी आणि उन्हाळी परीक्षेत अनिवार्य असलेली प्रात्यक्षिक परीक्षा ही त्या महाविद्यालयाचे विषय शिक्षक ‘मॅनेज’करतात, अशी तक्रार विद्यापीठाकडे प्रात्त झाली आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यापीठाकडून बाह्यपरीक्षकांची नेमणूक केली जाते. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षेच्यावेळी विषय प्राध्यापक अथवा प्राचार्यांकडून बाह्यपरीक्षकांचे लाड पुरविले जात असल्याची ओरड आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षा आता केवळ कागदोपत्रांची खानापूर्ती शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. परंतु, प्रात्यक्षिक परीक्षा ही नियमावली आणि निकषाच्या आधारावर घेण्यात यावी, यासाठी फिरत्या पथकाद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या हिवाळी २०१९ परीक्षा प्रारंभ झाल्या आहेत. ५ ते २० डिसेंबर दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षेत विषय प्राध्यापकांकडून हाणारी सेटींग रोखण्यासाठी आता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांवर प्रात्यक्षिकांचे गुण देताना पारदर्शकता आणली जाणार आहे. काहीही न करता मर्जीतील विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणीचे प्रात्यक्षिक गुण दिले जात होते. मात्र, आता फिरत्या पथकाद्वारे प्रात्यक्षिक परीक्षेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. बी.ए. बी.कॉम, बीएस्सी यासह अन्य अभ्यासक्रम शाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये सेटींग थांबणार आहे.प्रात्यक्षिक परीक्षांचा कालावधी १५ दिवसांचा असतो. त्यानुसार या परीक्षांचे नियोजन केले जाते. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षांवर नियंत्रणासाठी नियुक्त बाह्यपरीक्षकांचे नियंत्रण नसल्याने या परीक्षा केवळ कागदोपत्री सुरू असल्याचा तक्रारी आहेत. त्यानुसार फिरते पथक गठित करण्यात आले.- हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ अमरावती
विद्यापीठात कागदोपत्री प्रात्यक्षिक परीक्षेला लगामविद्यापीठात कागदोपत्री प्रात्यक्षिक परीक्षेला लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक (प्रॅटिकल) परीक्षांमध्ये कागदोपत्री खानापूर्तीला लगाम ...
विद्यापीठात कागदोपत्री प्रात्यक्षिक परीक्षेला लगामविद्यापीठात कागदोपत्री प्रात्यक्षिक परीक्षेला लगाम
ठळक मुद्देफिरते पथक : बाह्यपरीक्षकांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह