शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मिठाई-पेढ्यात कागदाचा लगदा !

By admin | Updated: October 29, 2016 00:09 IST

सणासुदींच्या दिवसांत मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तोंड गोड करण्याच्या सात्विक परंपरेचा ...

काय खातो आम्ही ? : ब्लिचिंगसाठी घातक रसायनांचा वापर, कॅन्सरला आमंत्रण अमरावती : सणासुदींच्या दिवसांत मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तोंड गोड करण्याच्या सात्विक परंपरेचा आणि आनंदमय भावनांचा अत्यंत घातकरीत्या व्यावसायिक वापर केला जात आहे. प्रक्रिया केलेल्या कागदाच्या लगद्याची जीवघेणी भेसळ मिठाई-पेढ्यांमध्ये केली जात आहे. दुधाचा तुटवडा आणि कमी लागतीत तगडा नफा कमविण्याची लालसा या भेसळीला बळ देत आहे. अस्तित्वात असूनही नसल्यासारखे आणि कारवाईदरम्यान पेश करण्यात आलेल्या काजुच्या प्लेट मूकपणे स्वीकारणारे अन्न प्रशासनाचे अधिकारी या भयंकर भेसळीकडे कानाडोळा करीत नसतील तरच नवल. मिठाईसाठी खवा मोठ्या प्रमाणात लागतो. दुधाचा तुटवडा असताना खवा करणार कसा? शुद्ध आणि मनुष्याने खाण्यायोग्य परिमाणांचा खवा बाहेरून बोलवायचा असेल तर मिळणारा नफा नेटकाच असतो. २० टक्क्यांपर्यंतच्या नफ्यात काम करावे, असे व्यवस्थेला अपेक्षित असले तरी 'लागतीपेक्षा उत्पन्न अधिक' या मानसिकतेतून काम करणारे व्यावयायिक हव्यासापोटी काहीही करण्यास सज्ज असतात. खाद्यान्नाच्या नावावर लोकांच्या पोटात आपण काय शिरवतो आहोत, याचा जराही विचार त्यांच्या ठायी नसतो. कर्करोग निर्माण करू शकणाऱ्या कागदाच्या लगद्याच्या भेसळीचा प्रकार याच निगरगट्ट मानसिकतेतून सुरू आहे. टिश्यूपेपर किंवा पेपर नॅपकीनसाठी वापरले जातात, अशा पद्धतीच्या अत्यंत पातळ कागदापासून भेसळीसाठीचा हा लगदा तयार केला जातो. लगदा तयार करण्याची विशिष्ठ पद्धती आहे. हा लगदा व्यावसायिक स्वत: तयार करतातच, शिवाय अलिकडे या लगद्याचा व्यावसायिक पुरवठादेखील सुरू झाला आहे. मध्यप्रदेश प्रांतातून कागदाच्या लगद्याच्या पेट्या मोठ्या प्रमाणात मिठाई विकणारे व्यावसायिक घेत आहेत. भेसळीच्या या लगद्याला रंग ठेवला जात नाही. ब्लिच करून रंग काढला जातो. पांढऱ्या रंगाचा हा लगदा खव्यात मिसळला जातो. एकजीव केला जातो. खवा खराब होऊ नये, यासाठी विशिष्ट रसायनांचा उपयोग केला जातो. हा लगदा मिसळताना ज्या स्वादाची मिठाई तयार करावयाची असेल त्या स्वादाचा 'इसेन्स' टाकला जातो. इसेन्स अर्थात् हव्या असलेल्या फळाचा, मेव्याचा भास निर्माण करणारा रासायनिक गंध. नाकाला हा गंध संबंधित पदार्थाच्या अस्तित्वाचा अनुभव देतो. हा अनुभव अधिक खरा वाटावा यासाठी अनुकूल रंगही मिसळला जातो. उदाहरण सांगायचे झाल्यास पायनॅपल बर्फीमध्ये पायनॅपल टाकल्याचे जाणवावे यासाठी पायनॅपलचा 'इसेन्स' टाकला जातो. पायनॅपलच्या रंगाशी मेळ खाणारा पिवळा रंगही मिसळला जातो. त्यामुळे ही मिठाई खाणाऱ्याला भेसळयुक्त बर्फीचा स्वाद अगदी खऱ्या पायनॅपलपासून तयार केलेल्या बर्फीप्रमाणेच जाणवतो. पायनॅपलपासनू बर्फी तयार केल्याचे सांगून मिठाई विकताना आकारले जाणारे दर प्रत्यक्ष पायनॅपलयुक्त मिठाईसाठीचेच आकारले जातात. अत्यंत विश्वासाने पायनॅपलसाठीचे पैसे मोजून आम्ही शरीराला घातक लगदा खात असतो. ब्लिचिंगसाठी वापरलेल्या आम्लादी घातक रसायनांचा अंश असलेली ही मिठाई आम्ही आमच्या घरातील चिमुकल्या जीवांनाही लाडकौतुकाने भरवित असतो. आजारी, वृद्ध आणि गर्भार महिलांनाही ही भेसळ आम्ही खाऊ घालतो. आरोग्य हेच खरे धन. पैसे मोजून कॅन्सरसारखे आजार विकत घेण्याऐवजी आईच्या, गृहलक्ष्मीच्या हातचे गोड पदार्थच दिवाळीत खरे धन देणारे ठरतील! (प्रतिनिधी)रघुवीरवर मेहेरबानसणासुदीच्या दिवसांत अवघ्या महाराष्ट्रात एफडीएची धडाकेबाज कारवाई सुरू आहे. मिठाईत भेसळीचे अनेक पुरावे समोर येत आहेत. रघुवीरच्या अन्नपदार्थांबाबत तक्रारी झाल्या आहेत. 'काजूप्रेमी' असलेल्या अमरावतीच्या अन्न प्रशासनाने तेथील मिठाईचे नमुनेदेखील घेतले नाहीत.