शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

पांदण रस्त्यावरील पूल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

रस्त्याच्या मध्ये हा नाला वाहत असल्याने तो ओलांडून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे वारंवार तक्रारी दिल्यानंतर येथे पूल बांधकामाला मंजुरी मिळाली. परंतु सदर कंत्राटदारांनी तात्पुरत्या स्वरूपात या पुलावर कच्चा रस्ता बनविला. पावसामुळे संपूर्ण रस्ताच वाहून गेल्याने आता शेतकऱ्यांना शेती साहित्य डोक्यावर घेऊन त्या नाल्यातून पाय तुडवीत शेतात जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील देवरी निपाणी ते जळका हिरापूर मार्गावरील पुलासह संपूर्ण रस्ताच दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात बी-बियाणे नेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाल्यावरील पूल बांधकामाला मंजुरी मिळाली. परंतु लॉकडाऊन दरम्यान कामे ठप्प असल्याने ते पूर्ण होऊ शकले नाही.देवरी निपाणी ते जळका हिरापूर मार्गावर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेती आहे. परंतु रस्त्याच्या मध्ये हा नाला वाहत असल्याने तो ओलांडून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे वारंवार तक्रारी दिल्यानंतर येथे पूल बांधकामाला मंजुरी मिळाली. परंतु सदर कंत्राटदारांनी तात्पुरत्या स्वरूपात या पुलावर कच्चा रस्ता बनविला. पावसामुळे संपूर्ण रस्ताच वाहून गेल्याने आता शेतकऱ्यांना शेती साहित्य डोक्यावर घेऊन त्या नाल्यातून पाय तुडवीत शेतात जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सदर बांधकाम मंजूर करण्याबाबत कोणत्या प्रकारचे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत.शेतकरी चिंताग्रस्तदेवरी निपाणी ते जळका हिरापूर येथील पांदण रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे या शेतकºयांना शेती पडीक राहील की काय, असे वाटू लागले आहे. सद्यस्थितीत रस्त्याने बैलजोडी किंवा ट्रॅक्टर नेणे अशक्य झाले आहे. सोयाबीन आणि रासायनिक खते शेतात पेरणीकरिता कसे न्यावेत, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या पांदण रस्त्यावरुन दोन ते तीन गावांतील नागरिकांची ये-जा असते. मात्र पूल वाहून गेल्याने शेती कामासाठी लागणारी अवजारे कशी न्यायची, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. महसूल यंत्रणेने त्याची दखल घेऊन तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस