सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:20 PM2018-08-17T22:20:12+5:302018-08-17T22:20:40+5:30

कमी दाबाचा पट्टा नागपूर, वर्धाकडे पश्चिमेकडून वायव्यकडे सरकत आहे. येत्या २४ तासांत कमजोर होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत येत्या २४ तासांत काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.

Overcrowding in six circles | सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी

सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी

Next
ठळक मुद्देसार्वत्रिक पाऊस : २४ तासांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कमी दाबाचा पट्टा नागपूर, वर्धाकडे पश्चिमेकडून वायव्यकडे सरकत आहे. येत्या २४ तासांत कमजोर होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत येत्या २४ तासांत काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या २४ तासात सहा महसूल मंडळात अतिवृष्टीसह जिल्ह्यात सार्वत्रिक सरासरी ३६ मिमी पावसाची नोंद झाली.
मागील तीन आठवड्यांपासून खंड असलेल्या पावसाने दोन दिवसांपासून पुनरागमन केले आहे. या पावसाने खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळाली व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात १ जून ते १७ आॅगस्ट या कालावधीत ५४३ मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ४२३ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी ८४.५ आहे, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५६.३ टक्के पाऊस या कालावधीत पडला. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३६ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यात सर्वाधिक १०८.४ मिमी पाऊस सावलीखेडा मंडळात, सेमाडोह ८७.६, हरिसाल ८०.२, धारणी ७०, निंभा ९०.४, तर भातकुली मंडळात ७७.६ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात सर्वाधिक १३८.८ टक्के म्हणजेच ६८५ मिमी पाऊस नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पडला, तर १११ टक्के म्हणजेच ५६० मिमी पाऊस चांदूर रेल्वे तालुक्यात झाला. या दोनच तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. उर्वरित १२ तालुक्याची सरासरी माघारली आहे. सर्वात कमी ६३ टक्केच पाऊस चिखलदरा तालुक्यात पडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, अमरावती तालुक्यात ४३४ मिमी, भातकुली ३८४.८, नांदगाव खंडेश्वर ६८५.२, चांदूर रेल्वे ५५९.३, धामणगाव रेल्वे ४२७, तिवसा ३८६, मोर्शी ३८०.८, वरूड ४४४, अचलपूर ३६५.९, चांदूर बाजार ३७९.१, दर्यापूर ४१९, अंजनगाव सुर्जी ३३३.३, धारणी ६०० व चिखलदरा तालुक्यात ६२४.८ मिमी पावसाची नोंद झाली.
अनिल बंड यांच्या माहितीनुसार, १८ व १९ आॅगस्टला हलका ते मध्यम पाऊस, २० व २१ ला बहुतेक ठिकाणी सार्वत्रिक स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस, २२ ते २४ दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलका पाऊस होणार आहे.
सार्वत्रिक दमदार पावसाचे पुनरागमन
मागील २४ तासांत जिल्ह्यात सार्वत्रिक ३६ मिमी पाऊस पडला. यामध्ये अतिवृष्टीचे पाच मंडळ वगळता, अमरावती मंडळात ५२.२ मिमी, वडाळी ५५.२, नवसारी ४८.४, वलगाव ६१.३, खोलापूर ६१.३ नामदगाव खमडेश्वर ५६, दाभा ५२, खोलापूर ६१.३, नांदगाव खंडेश्वर ५६, दाभा ५२, धानोरा गुरव ५९, माहुली चोर ४१, लोणी ५५, पापळ ६२, शिवनी ५८, मंगरूळ चव्हाळा ५७, चांदूर रेल्वे ४९, घुईखेड ४२, सातेफळ ४७.२, पळसखेड ४५, अंबाडा ४१, चांदूर बाजार ५२, बेलोरा ४२, तिलोरी ४३, धूळघाट ५१, चिखलदरा ५४, टेंभुरखेडा ४५ व चुरणी महसूल मंडळात ४१ मिमी पावसाची नोंद झाली.

Web Title: Overcrowding in six circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.