जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शाळा २६ जूनपासून सुरू झाल्या. प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले. आता पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील ५ लाख ११ हजार १२६ विद्यार्थ्यांना शाळेची घंटा कधी वाजणार, याचे वेध लागले आहेत. २ लाख ४४ हजार ४५० विद्यार्थ्यांच्या कुटुंबात स्मार्टफोन व एवढ्याच विद्यार्थ्यांच्या घरी टीव्ही असल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाची सुविधा आहे. मात्र, ७६ हजार ६६९ विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी कुठलीही सुविधा नाही. त्यांचे शिक्षण या पद्धतीत थांबणार आहे.कोरोना संसर्ग वाढत असला तरी शासनाने नववी, दहावी, बारावीचे वर्ग जुलैपासून, सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून आणि पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याशिवाय सरकारसमोर पर्यायच उपलब्ध नाही, अशी ग्रामीण भागाची परिस्थिती आहे. ७६ हजार ६६९ विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन, रेडिओ, टीव्ही यापैकी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यास अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण तर थांबणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या २८८९ शाळांपैकी ९६५ मध्ये संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे वर्ग कसे सुरू करायचे, ही समस्या आहे. कोविड उपाययोजनांसाठी २१७६ शिक्षक नियुक्त आहेत. त्यांच्याबाबत अडचण येऊ शकते. एक दिवसाआड शाळा सुरू होऊ शकणाºया शाळा ४३७ आहेत, तर पूर्णवेळ सुरू होऊ शकणाºया १८४२ शाळा आहेत.कोरोनामुळे सध्या शाळा-महाविद्यालये बंद आहेत. नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्याच्या अनुषंगाने कोणत्या सुविधा शाळांकडे आहेत वा नाहीत, याबाबत सर्व बीईओंकडून १ ते १२ शाळांची माहिती मागविली होती. त्यानुसार शिक्षण विभागाकडे ही माहिती संकलित करण्यात आली.- नितीन उंडेउपशिक्षणाधिकारी
पाच लाखांवर विद्यार्थ्यांना शाळेचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:01 IST
कोरोना संसर्ग वाढत असला तरी शासनाने नववी, दहावी, बारावीचे वर्ग जुलैपासून, सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून आणि पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याशिवाय सरकारसमोर पर्यायच उपलब्ध नाही, अशी ग्रामीण भागाची परिस्थिती आहे. ७६ हजार ६६९ विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन, रेडिओ, टीव्ही यापैकी कोणतीही सुविधा नाही.
पाच लाखांवर विद्यार्थ्यांना शाळेचे वेध
ठळक मुद्देशिक्षण : ७६ हजार विद्यार्थी राहू शकतात ‘आॅनलाईन’ शिक्षणापासून वंचित