व्यावसायिकांनी केले फुटपाथ गडप : पोलीस विभागाचे अभयसंदीप मानकर अमरावतीबडनेरा महामार्गावर, राजापेठ पोलीस ठाण्यालगतच्या रघुवीर स्वीट मार्टसह अनेक व्यावसायिकांनी फुटपाथ गडप केले आहेत. पोलिसांच्या डोळयांदेखत नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याला राजापेठ पोलिसांचे अभय असून पोलिसांना हप्ते किती, असा प्रश्न विचारला जात आहे. येथील रघुवीर रिफ्रेशमेंटसह, स्टुडीओ ६९, फेस हॉस्पिटल, सरस्वती मिल्क, येथील एक बार, साहिल आॅप्टिकल आदी व्यवसायिकांनी येथील फुटपाथ गडप केली आहे. या व्यावसायिकांकडे येणारे ग्राहक राजोरोसपणे फुटपाथवर वाहने लावून अतिक्रमणक करतात. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत आहे. परिणामी या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेने नागरिकांना सुरक्षित चालता यावे. यासाठी फुटपाथत बांधण्यात आल्या पण अनेक व्यवसायिकांनी आपल्या प्रतिष्ठांनाची बांधकाम करताना स्वतंत्र्य पार्किंग व्यवस्था निर्माण केली नाही. आपल्या स्वार्थासाठी फुटपाथचा वापर आपल्या सोयीनुसार करू लागले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी गडप केलेल्या शहरातील फुटपाथचा श्वास मोकळा करावा, ही भूमिका 'लोकमत'ने लोकदरबारात मांडली आहे. येथील रघुवीरमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांची सर्वाधिक गर्दी असते. त्यामुळे येथे नागरिकांना चालता येत नाही. त्यांना बाजूला राज्य महामार्गावरून चालावे लागते. यात लहान विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. एखादा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. बाजूलाच लागून राजापेठ पोलीस ठाणे आहे. याला येथील वाहतूक पोलिसांचे आश्रय असून त्यांचे येथील व्यापाऱ्यांशी हप्ते बांधले असल्यामुळे कुठलीच कारवाई करण्यात येत नाही, अशी चर्चा आहे. सीपींनी पुढाकार घ्यावा रघुवार रिफ्रेशमेंटजवळील अनेक व्यापाऱ्यांनी फुटपाथ गडप केले आहेत. येथे वाहतूक पोलिसांनी फुटपाथवर नियमबाह्य पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, पण असे होत नाही. या व्यवसायिकांकडूुन पोलिसांना हप्ते किती, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनीच ही कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा, कारण काही अंतरावरच राजापेठ पोलीस ठाणे असताना कारवाई का होत नाही, हा प्रश्न चर्चेला जात आहे.
नियमबाह्य पार्किंग, पोलिसांना हप्ते किती ?
By admin | Updated: June 24, 2016 00:29 IST