शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिकस्त इमारतींतून ७३ ग्रा.पं.चा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:04 IST

ग्रामपंचायत गावाच्या विकासाची केंद्रबिंदू असते. तथापि, जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींपैकी १४ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींचा कारभार शिकस्त इमारतींमधून चालविला जात आहे. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतींनी जनसुविधा योजनेंतर्गत सन २०१६-१७ पासून जिल्हा परिषदेकडे इमारत बांधकामासाठी निधीची मागणी केली आहे.

ठळक मुद्देकेव्हा होईल दुरुस्ती? : २०१६ पासून निधी मागणीचे प्रस्ताव पडून

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामपंचायत गावाच्या विकासाची केंद्रबिंदू असते. तथापि, जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींपैकी १४ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींचा कारभार शिकस्त इमारतींमधून चालविला जात आहे. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतींनी जनसुविधा योजनेंतर्गत सन २०१६-१७ पासून जिल्हा परिषदेकडे इमारत बांधकामासाठी निधीची मागणी केली आहे. त्यापैकी एकाही ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करवून देण्यात आलेला नाही.ग्रामपंचायत इमारत वा भवनाशिवाय गावांची कल्पनाच करता येत नाही. गाव तेथे ग्रामपंचायत असे राज्य शासनाचे धोरण आहे. पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावांचा प्रशासकीय कारभार सांभाळण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वसूल केले जातात. शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतींमार्फत राबविल्या जातात. परंतु, ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतीच धोकादायक असेल, तर गावांचा विकास होणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होतो.जिल्ह्यातील १४ तालुक्यात ८४० ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी तिवसा तालुक्यात पाच, भातकुली १०, चांदूरबाजार १४, अमरावती एक, चांदूर रेल्वे एक, मोर्शी ११ , वरूड चार, अंजनगाव चार, दर्यापूर १०, नांदगाव खंडेश्वर चार याप्रमाणे ७३ ग्रामपंचायतींच्या इमारती शिकस्त झाल्या आहेत. चार वर्षांपासून ग्रामीण भागातील ८४० ग्रामपंचायतीपैकी ७३ ग्रामपंचायतींचा कारभार शिकस्त व वापरण्यास अयोग्य असलेल्या इमारतीतून सुरू आहे. सदर ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडे जनसुविधा ग्रामपंचायत विशेष अनुदानाअंतर्गत सन २०१६-१७ पासून इमारत बांधकामासाठी सातत्याने प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, या प्रस्तावांची जिल्हा परिषदस्तरावर दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी प्रशासनाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा सवाल ग्रामपंचायतचे पदाधिकारी व नागरिकांंनी उपस्थित केला आहे.मग जनसुविधेचा फायदा काय?ग्राम विकासाची मुख्य जबाबदारी सांभाळणाऱ्या ग्रामपंचायतींना जनसुविधा योजनेतून विशेष अनुदान उपलब्ध करू न दिले जाते. त्यामधून स्मशानभूमी, रस्ते, ग्रामपंचायत इमारती व अन्य कामे करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, मागील काही वर्षात जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत इमारत बांधकामाकडे डोळझाक करण्यात आली. स्मशानभूमी शेड, रस्ते, नाल्या याच कामांना प्राधान्य देण्यात आले. परिणामी ग्रामपंचायतीच्या शिकस्त व वापरण्यास अयोग्य इमारतीतूच कामकाज चालविले जात आहे. त्यामुळे जनुसुविधा योजनेचा फायदा तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.