शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टरमध्ये संत्रागळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:09 IST

कोरड्या दुष्काळात पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी संत्राझाडासह आंबिया बहर टिकविला. मात्र, आता अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात संत्राफळांना गळती लागल्याने शेतकरी हादरून गेला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हादरला : एकीकडे दुष्काळाच्या झळा; दुसरीकडे आंबिया गळाला

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : कोरड्या दुष्काळात पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी संत्राझाडासह आंबिया बहर टिकविला. मात्र, आता अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात संत्राफळांना गळती लागल्याने शेतकरी हादरून गेला आहे. तप्त उन्हाळा, कोरड्या पडलेल्या विहिरी व बोअर, प्रचंड पाणीटंचाई यातून सावरलेल्या शेतकऱ्यांवर गळतीच्या रूपात मोठे अस्मानी संकट कोसळले आहे.वरूड तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर जमिनीमध्ये संत्राचे पीक घेतले जाते. सुमारे ७५ टक्के शेतकरी संत्र्याचे पीक घेतात. २०१८ साली कोरडा दुष्काळ पडल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला होता. विहिरी, बोअर आटल्याने तालुक्यात ८ हजार ४०० हेक्टर शेतजमिनीवरील संत्राझाडे सुकली होती. यातून संत्रा उत्पादक कसाबसा सावरला. परंतु, पावसाळा उशिराने आला आणि पुन्हा आंबिया बहराच्या संत्राफळाला गळती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. संत्राफळांचे देठ पिवळे पडून ती पिवळी पडल्यावर मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. झाडाखाली शेकडो संत्री गळून पडत असल्याने उत्पादक हवालदिल झाला आहे.संत्रा उत्पादकांना जीवदान देण्यासाठी शासनाने आर्थिक मदतीसह कृषी विभागाकडून सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याची मागणी संत्राउत्पादक शेतकरी करीत आहेत.कृषिमंत्र्याच्या मतदारसंघात संत्रा उत्पादकांची दैनाविदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेला राज्याचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांचा हा मतदारसंघ अन् गृहजिल्हाही. या जिल्ह्यातील मोर्शी, वरूड, अचलपूर व चांदूरबाजार या चार तालुक्यात संत्र्यागळीचा प्रकार अधिक प्रमाणात आहे. मंत्रिमहोदयांचा दौरा झाला. वाळलेल्या संत्रा झाडासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतून मदत दिली जाणार असल्याचे ना. बोंडे यांनी सांगितले. मात्र, संत्राबागांमध्ये होत असलेल्या फळगळीबाबत चकार शब्द काढलेला नाही. संत्राउत्पादकांचे कोट्यावधीचे नुकसान होत असताना कृषी विभागदेखील पुढे सरसावला नसल्याचे वास्तव आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर आता कुठे जिल्हा प्रशासनाला जाग आली. आता कुठे संत्राझाडांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.संत्राउत्पादकांना हवी मदतउत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा जगविण्याकरिता पाण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. त्यातून कसाबसा सावरला असताना आता आंबिया बहराला गळती लागली. लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने संत्राउत्पादकांना शासनाने हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बेनोडाचे संत्राउत्पादक विवेक आलोडे यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी