लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा येथील पाच बंगला राठीनगरात खासगी जागेवर उभारण्यात येणाºया मोबाईल टॉवरला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. महापालिका प्रशासनाने या टॉवरला प्राथमिक स्वरूपात दिलेली परवानगी रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना दिलेल्या निवेदनानुसार, बडनेऱ्यातील पाच बंगला राठीनगर येथील संतोष भटकर यांच्या खासगी जागेवर हे मोबाईल टॉवर उभारणीचा प्रस्ताव आहे. मात्र, हे टॉवर उभारू नये, याकरिता ९ ऑक्टोबर व १५ नोव्हेंबर रोजी स्थानिकांनी महापालिका आयुक्त व सहायक संचालक नगर रचना यांना प्रत्यक्ष भेटून वस्तुस्थिती कळविली. दरम्यान मोबाईल टॉवर उभारणीचे काम स्थगित ठेवावे, असे आदेश नगर रचना विभागाने दिले. मात्र, मोबाईल कंपनीच्या अभियंत्यानी सलग तीन दिवस हे काम सुरूच ठेवल्याचा आरोप नागरिकांनी केला. पुन्हा तक्रार केल्यानंतर मोबाईल टॉवरचे काम तात्पुरते स्थगित ठेवण्यात आले. हल्ली या जागेवर मोठा खड्डा केलेला आहे. हे बांधकाम कायमस्वरूपी बंद करून प्राथमिक स्वरूपाची परवानगी रद्द करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी बाळकृष्ण देशभ्रतार, प्रगती देशभ्रतार, अजय मेश्राम, अर्चना मेश्राम, रिमा भोसले, शिवचरण भोसले, विद्या राऊत आदी उपस्थित होते.
बडनेऱ्यात मोबाईल टॉवर उभारणीला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:01 IST
महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना दिलेल्या निवेदनानुसार, बडनेऱ्यातील पाच बंगला राठीनगर येथील संतोष भटकर यांच्या खासगी जागेवर हे मोबाईल टॉवर उभारणीचा प्रस्ताव आहे. मात्र, हे टॉवर उभारू नये, याकरिता ९ ऑक्टोबर व १५ नोव्हेंबर रोजी स्थानिकांनी महापालिका आयुक्त व सहायक संचालक नगर रचना यांना प्रत्यक्ष भेटून वस्तुस्थिती कळविली.
बडनेऱ्यात मोबाईल टॉवर उभारणीला विरोध
ठळक मुद्देआयुक्तांना साकडे : प्राथमिक स्वरूपाची परवानगी रद्द करा