‘सूर रायझिंग स्टारचे’मधून मिळणार प्रतिभावान गायकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:27 AM2018-01-18T00:27:11+5:302018-01-18T00:27:31+5:30

आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. कधी आर्थिक कारणांमुळे, कधी कौटुंबिक कारणांमुळे, तर कधी व्यासपीठच न मिळाल्यामुळे अनेक कलावंत समाजासमोर येतच नाहीत.

Opportunity for talented singers to get the opportunity of 'Sur Raising Starch' | ‘सूर रायझिंग स्टारचे’मधून मिळणार प्रतिभावान गायकांना संधी

‘सूर रायझिंग स्टारचे’मधून मिळणार प्रतिभावान गायकांना संधी

googlenewsNext
ठळक मुद्दे२० जानेवारीला : कलर्स व लोकमत समूहाचा उपक्रम

अमरावती : आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. कधी आर्थिक कारणांमुळे, कधी कौटुंबिक कारणांमुळे, तर कधी व्यासपीठच न मिळाल्यामुळे अनेक कलावंत समाजासमोर येतच नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या कला, कौशल्य प्रतिभेला नवे पंख देण्यासाठी लोकमत समूह नेहमीच तत्पर असतो. विविध कार्यक्रम, स्पर्धा, टॅलेंट शो आयोजित करून या ‘उद्या’च्या सुपरस्टार्सना प्रकाशझोतात आणले जाते.
सुरांचे देणं लाभलेल्या प्रतिभावान गायकांना एक नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी 'लोकमत' आणि कलर्स वाहिनी आगळावेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. ‘सूर रायझिंग स्टार’चे असे त्याचे नाव. कलर्स व लोकमतद्वारे आयोजित ही गायन स्पर्धा २० जानेवारीला अभियंता हॉल, शेगाव नाका चौक, व्हि.एम.व्हि. रोड, अमरावती येथे दुपारी ४ वाजता होणार आहे. यात ४ वर्षांवरील मुले-मुली, स्त्री-पुरुष सहभागी होऊ शकतात.
विशेष म्हणजे या प्रयत्नांना यंदा साथ मिळाली ती कलर्स वाहिनीची. मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांची निर्मिती करून छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या घराघरांमध्ये कलर्सने बोलबाला निर्माण केला आहे. शुद्ध, कौटुंबिक, संस्कारक्षम कार्यक्रमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासोबत सामाजिक बांधिलकी जोपासणारेही अनेक उपक्रम राबविले जातात.
कार्यक्रम स्थळी वेळेवर नोंदणी करता येणार नाही. स्पर्धेची अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी अधिक माहितीसाठी : लोकमत कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती 9850304087, 9850911887, 9922968526 या क्रमांकावर संपर्क करावा.

‘रायझिंग स्टार’च्या निमित्ताने कलर्स वाहिनी घेऊन येत आहे भारतातील पहिल्या लाईव्ह रिअ‍ॅलिटी शोचे दुसरे पर्व, ज्याद्वारे मोडल्या जाणार विचारांच्या चौकटी. आता तुम्ही म्हणाल की, विचारांची चौकट म्हणजे काय? समाजाने आपल्या भोवती अशा काही चौकटी निर्माण केल्या आहेत, ज्या आपल्या विकासाला मारक ठरतात. भाषा, जात, आर्थिक स्थिती, धर्म अशा विविध चौकटींची आज काहीही एक गरज नाही. अशा चौकटींचे बंधने झुगारून आपले टॅलेंट जगासमोर आणणाºया गायकांना या चौकटी मोडण्यास मदत म्हणून या 'शो'च्या माध्यमातून तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपºयातून लाईव्ह व्होटींग करू शकता. यामध्ये साथीला आहेत भारतातील तीन सुप्रसिद्ध महारथी परीक्षक, गायक व संगीतकार शंकर महादेव, गायिका मोनाली ठाकूर आणि अभिनेता व गायक दिलजित दोसांज. परंतु, खरे परीक्षक तर कलर्स वाहिनी पाहणारे देशातील १३० कोटी भारतीयच असणार आहेत. मग या सिझनमध्ये केवळ विचारांच्या चौकटीत नाही मोडल्या जाणार, तर देशातील प्रतिभावान गायकांचे नशीबही बदलणार आहे. कलर्स वाहिनीवर २० जानेवारीपासून दर शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता सुरू होत आहे देशातील एकमेव लाईव्ह सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो ‘‘रायझिंग स्टार’’.

Web Title: Opportunity for talented singers to get the opportunity of 'Sur Raising Starch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.