शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

‘ऑपरेशन मुस्कान’चा ‘की पर्सन’ खुशियालचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 17:15 IST

बोथरा गावात शोककळा : २७ डिसेंबरला आणले होते मुलांना, १ डिसेंबरपासून होता बेपत्ता, शुक्रवारी आढळला मृतदेह

धारणी (अमरावती) : किचकट आणि अवजड कामे करत असलेल्या मेळघाटातील १० अल्पवयीन मजुरांना अहमदाबाद येथून परत आणण्यात ‘की पर्सन’ ठरलेल्या २२ वर्षीय युवकाचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे उघड झाले. तो १ जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याच्या मृत्युने बोथरा गावात शोककळा पसरली आहे. खुशियाल रामलाल जावरकर (वय२२ वर्ष) असे मृताचे नाव आहे. धारणी तालुक्यातील बोथरा येथील १० मुलांकडून सुलभ काम आणि जादा पगाराच्या आमिषातून अवजड कामे करून घेतली जात होती. अहमदाबाद येथे त्याच्यासह काम करीत असलेल्या या मुलांच्या सुटकेसाठी धारणी पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान राबवले. २७ डिसेंबरला या मुलांना बोथरा येथे परत आणले होते. या संपूर्ण मोहिमेत खुशियाल हा  महत्त्वाचा दुवा होता. त्याने स्वत:कडील मोबाइलद्वारे या मुलांबाबत राइज फाउंडेशनचे ऋषिकेश खिलारे यांना माहिती कळविली. 

त्यांच्या माध्यमातून धारणी पोलिसांना सूचना देण्यात आल्या.२७ डिसेंबरला ही मुले आई-वडिलांकडे परत आली. परंतु, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच ‘ऑपरेशन मुस्कान’चा मुख्य दुवा असलेला खुशियाल बेपत्ता झाला होता. गावक-यांकडून त्याचा शोध घेतला जात असताना, शुक्रवारी संध्याकाळी गावातील जंगलामध्ये गुराखी श्रावण कालू  धुर्वे यांनी खुशियालचे मृतदेह पाण्याच्या डबक्यात पाहिला. जमादार प्रमोद बाळापुरे आणि शिपाई राजेश अहिर यांनी त्याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय आणला. शनिवारी सकाळी डॉक्टर दिनकर पाटील यांनी पोस्टमार्टम केल्यानंतर खुशियालचा मृतदेह त्यांच्या पालकांचे स्वाधीन केला.

वडील रामलाल जावरकर यांचेकडे एक एकर कोरडवाहू जमीन असून, त्यातून कोणतेही उत्पन्न होत नसताना आपला खांदा पुरुष अचानक पणे सोडून गेल्यामुळे रामलालच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.  कुटुंबाडा आधारवड हरपला खुशियाल जावरकर हा कुटुंबातील कर्ता व्यक्ती होती. त्याचा मोठा भाऊ विनोद आजारी राहत असल्यामुळे त्याच्यासह आई-वडील, वहिनी आणि दोन मुलांची खुशियालवर जबाबदारी होती, तो मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवित असे. त्याच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.  मजूर कंत्राटदाराकडून घातपात?खुशियाल हा ऑपरेशन मुस्कानचा ‘की पर्सन’ होता. त्याने लपविलेल्या मोबाइलमुळे अहमदाबाद येथील रंग कंपनीमधून १० मुलांची सुटका करता आली. याप्रकरणी मजूर ठेकेदाराकडून घातपाताची शंका सामाजिक कार्यकर्ते ऋषीकेश खिल्लारे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.  ऑपरेशन मुस्कान मोहिमेंतर्गत बोथा गावातील या १० मजुरांना गुजरातमधून परत आणण्यात आले, त्यात खुशियालचा समावेश होता. त्याच्या आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.  - विलास कुळकर्णी, पोलीस निरीक्षक, धारणी