शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Blast Case Verdict : प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
3
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
4
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
5
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
7
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
8
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
9
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
10
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
11
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
12
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
13
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
14
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
15
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
16
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
17
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
18
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
19
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
20
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट

कामगार उपायुक्त कार्यालयाला सापडला मुहूर्त, १४ सप्टेंबरला उद्घाटन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 17:23 IST

सात वर्षांपासून रखडलेल्या कामगार उपायुक्त कार्यालयास अखेर मुहूर्त सापडला.

अमरावती - सात वर्षांपासून रखडलेल्या कामगार उपायुक्त कार्यालयास अखेर मुहूर्त सापडला. कामगार मंत्री संजय कुटे यांच्या प्रयत्नांतून अमरावतीला हे विभागीय कार्यालय उपलब्ध झाले आहे. १४ सप्टेंबरला या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. याचा अमरावती विभागातील ४५ लाख ३८ हजार १८ कामगारांना लाभ होणार आहे. यापूर्वी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील कामगारांना  त्यांच्या समस्यांचे निराकरणासाठी नागपूर येथील कार्यालयात जावे लागत होते. साधारणत: १५० ते ४५० किमी प्रवासभाडे व किमान दोन दिवसांचा वेळ यात खर्च व्हायचा. आता अमरावतीलाच कार्यालय झाल्याने कामगारांचा वेळ व पैसा वाचणार आहे. कामगार उपायुक्त कार्यालयासाठी संवर्ग ‘अ’ मधील उपायुक्त, संवर्ग ‘ब’ मधील दोन सहायक कामगार आयुक्त, चार सरकारी कामगार अधिकारी यांच्यासह ३३ कर्मचारी असा एकूण ४० शासकीय अधिकारी व कार्मचारी मनुष्यबळ या कार्यालयास उपलब्ध करण्यात आलेले आहे. अमरावती विभागात या कार्यालयांतर्गत ६४१ कारखाने आणि १ लाख १७ हजार ४५ वाणिज्यिक आस्थापना आहेत. या कारखान्यात ६० हजार २८२ कामगार वाणिज्यिक आस्थापनेतील ७९ हजार ८२७ कामगार व असंघटित क्षेत्रातील ४३ लाख ९७ हजार ९०९ कामगार आहेत. याशिवाय पाच जिल्ह्यांसाठी स्वतंत्र माथाडी व असंघटित कामगार मंडळे कार्यरत आहेत. याशिवाय अमरावती जिल्हा सुरक्षा मंडळ अमरावती कार्यालयाच्या अखत्यारित पाचही जिल्हे येतात. यामध्ये सन २०१३ पासून १८४८ सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ अंतर्गत पाचही जिल्ह्यांमध्ये ४५ हजार ४५१ कामगारांची नोंदणी झालेली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत पाचही जिल्ह्यांतील २ लाख २७ हजार ७३१ बांधकाम कामगारांचीदेखील नोंदणी झालेली आहे. या सर्व कामगारांना याचा लाभ होणार आहे.

ना. संजय कुटे यांच्या निर्णयाची अंमलबजावणीविभागविषयक धोरणानुसार सन २०१२ मध्ये अमरावती येथे विभागीय कामगार उपायुक्त कार्यालय स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विभागातील कामगारांची मोठी अडचण निर्माण झाली होती. ना. कुटे यांनी पदभार स्वीकारताच अमरावतीत विभागीय कामगार उपायुक्त कार्यालय अस्तित्वात आणण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यात आला. याचा ४५ लाखांवर कामगारांना दिलासा मिळाला आहे. कार्यालयाचा उद्घाटन सोहळा ना. कुटे यांच्या हस्ते आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत शनिवारी होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती