शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

घरातील एकाच व्यक्तीला मिळणार पीएम किसानचे पैसे; बाकीच्यांचा पत्ता होणार कट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 14:45 IST

पीएम किसान योजना : अन्य सदस्यांचा पत्ता होणार कट केंद्र शासनाची नियमावली

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. यामध्ये घरातील शेती कुटुंबातील अनेकांच्या नावे असल्याने त्या सदस्यांना लाभ मिळतो. यामध्ये पती, पत्नी, मुलगा, मुलगी आदी या योजनेचा लाभ घेतात. आता या योजनेसाठी केंद्र शासनाने नवीन नियमावली लागू केली आहे. त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेतल्यास फक्त एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जातो. डिसेंबर २०१८ पासून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. या योजनेचे आतापर्यंत १८ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातही २.७८ लाख शेतकऱ्यांना १८ व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. सुरुवातीला योजनेत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, या योजनेत अपात्र शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनात आल्यात आल्याने ई-केवायसी व आधार लिंकिंग अनिवार्य करण्यात आलेली आहे.

अर्ज करताय? पत्नी, मुलांचे द्या आधार योजनेत पती, पत्नी आणि मुले आधार कार्ड जोडावे लागणार आहे. वारसा हक्क वगळता २०१९ पूर्वी ज्यांनी जमीन खरेदी केली, त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

१९ वा हप्ता कधी? १९ वा हप्ता पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये वितरित केला जाणार आहे. याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. शेतकरी नोकरदार किंवा संस्थांचे पदाधिकारी आहे व आयकराचा भरणा करीत असल्यास लाभ मिळणार नाही. 

२०१९ पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना मिळणार लाभ लाभर्थीच्या नावावर सन २०१९ पूर्वी जमिनीची नोंद आवश्यक आहे. १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीची वारसा हक्काची जमीन नोंद असल्यास त्या व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार आहे.

तुमच्या कुटुंबात पीएम किसानचे किती लाभार्थी? यानंतर पीएम किसान योजनेत कुटुंबातील अनेक व्यक्तींना योजनेचा लाभ मिळाला आहे. आता मात्र योजनेसाठी नवीन नियम आले आहेत. त्यानुसार एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

"पीएल किसान योजनेच्या निकषात केंद्र शासनाने काही बदल केले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना आता माहिती द्यावी लागेल, शिवाय केवायसी केली नसल्यास त्वरित करावी."- राहुल सातपुते, एसएओ.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाAmravatiअमरावती