लोकमत न्यूज नेटवर्कजरूड : शासनाने शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी सुरू करण्यात आलेली आॅनलाईन प्रक्रिया शेतकºयाांसाठी मोठी डोकेदुखी ठरली असून तासनतास सर्व्हर डाऊन असल्याने दिवसभरातून ४ ते ५ शेतकºयांचे अर्ज नोंदणी होत आहेत.‘सरसकट’ या शब्दाचा उपयोग करून दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. यातही १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत जे शेतकरी आॅनलाईन अर्ज भरतील त्यांनाच कर्जमाफीचा फायदा मिळेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार गावपाळीवर ग्रामपंचायत, सेतूकेंद्रे, ई-सेवा केंद्र येथे आॅनलाईन अर्ज प्रक्रिया शेतकºयांसाठी मोफत सुरू केली खरी; मात्र ही प्रक्रिया डोकेदुखी ठरत आहे. जे शेतकरी अपंग, अंध व ज्यांचे आधार कार्ड नाही अशा शेतकºयांसोबतच कर्ज घेतल्यावर मयत शेतकºयांचा प्रश्न एरणीवर येणार आहे. त्यांना योजनेचा लाभ मिळणार की नाही, असाही प्रश्न आहे. ज्यांनी पेरणीसाठी अग्रीम १० हजार रुयपे घेतले आहेत अशा शेतकºयांना या योजनेचा लाभ होणार का, असा प्रश्न शेतक री विचारू लागले आहेत.
आॅनलाईन प्रक्रिया शेतकºयांसाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:21 IST
शासनाने शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी सुरू करण्यात आलेली आॅनलाईन प्रक्रिया शेतकºयाांसाठी मोठी डोकेदुखी ठरली असून ....
आॅनलाईन प्रक्रिया शेतकºयांसाठी डोकेदुखी
ठळक मुद्दे'सर्व्हर डाऊन' : दिवसातून केवळ ४ ते ५ शेतकºयांची अर्ज नोंदणी