शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

सातशे रुपयांनी वधारला कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:40 AM

कांद्याचे भाव दोन आठवड्यांपासून सतत वाढत असून, क्विंटल मागे सातशे रुपयांनी दर वधारल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतिचा कांदा ४० ते ४५ रुपये किलोप्रमाणे विक्री करण्यात येत असल्याने व आणखीन भाव वाढण्याची शक्यता असल्याने यंदा कांदा सामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणणार, हे नक्की!

ठळक मुद्देकिरकोळ बाजारात ४० रूपये : यंदा कांदा आणणार डोळ्यात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कांद्याचे भाव दोन आठवड्यांपासून सतत वाढत असून, क्विंटल मागे सातशे रुपयांनी दर वधारल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.किरकोळ बाजारात चांगल्या प्रतिचा कांदा ४० ते ४५ रुपये किलोप्रमाणे विक्री करण्यात येत असल्याने व आणखीन भाव वाढण्याची शक्यता असल्याने यंदा कांदा सामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणणार, हे नक्की!अमरावती कृषिउत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजी मंडईत गावरान कांद्याची आवक ही ५०० क्विंटलपेक्षा अधिक झाली आहे. त्या कांद्याला ६०० ते २४४० रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. १५०० ते १७०० रुपये प्रति क्विंटलवरून कांदा थेट २४०० रूपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. सरासरी दोन आठवड्यांतील ही क्विंटल मागे ७०० रूपयांची दरवाढ आहे. त्याकारणाने आवक जरी कमी होत असली तरी स्थानिक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, चांगल्या प्रतिचा कांदा किरकोळ व्यावसायिक ठोकमध्ये २० ते २४ रुपयांनी खरेदी करीत असेल तरी भाजीविक्रेता त्यातून दामदुप्पट भावाने विक्री करून शंभर टक्के नफा कमावत असल्याचे सर्वश्रृत आहे. ठोक भाजी मंडईत २० ते २४ रुपये प्रतिकिलोचा कांदा किरकोळ व्यावसायिक ४० ते ४५ रुपये प्रतिकिलोने विक्री करीत आहे. किरकोळ भाजीविक्रेता प्रत्येक भाजीपाल्यावर शंभर टक्के नफा कमावित आहे. अशा पद्धतीने ग्राहकांची नेहमीच लूट करण्यात येत आहे. आणखीन कांद्याचे भाव वाढणार असल्याची शक्यता ठोक कांदा विक्रेत्यांनी वर्तविली आहे. त्या कारणाने कांदा डोळ्यात पाणी आणणार आहे, हे नक्की!इंदूरचा लाल कांदा अमरावतीत दाखलइंदूरचा लाल कांदा अमरावतीत दाखल होत आहे. त्यामुळे पांढऱ्या कांद्याच्या तुलनेत लाल कांदा स्वस्त असल्याने हा कांदासुद्धा नागरिक विकत घेत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पांढऱ्या कांद्याला २०० रूपयांनी भाव कमी मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी कांद्याला २६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता, हे विशेष!

टॅग्स :onionकांदा