शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

एक गाव अन् दोन सरपंच! जुन्या सरपंचांचा कार्यकाळ बाकी असल्याने  २६३ ग्रामपंचायतींमध्ये पेचप्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 19:08 IST

अमरावती जिल्ह्यातील २६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. प्रथमच जनतेतून थेट सरपंच निवडून आलेत.

अमरावती - जिल्ह्यातील २६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. प्रथमच जनतेतून थेट सरपंच निवडून आलेत. मात्र जुन्या सरपंचांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला नसल्याने सध्या या ग्रामपंचायतींमध्ये दोन सरपंच अस्तित्वात आहेत. जुन्या सरपंचांना धोरणात्मक अधिकार नाही, नव्यांना कार्यभार नाही, यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला आहे.नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाºया २६३  ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया आटोपली. यावेळी प्रथमच जनतेतून थेट सरपंचांची निवडणूक झाल्यामुळे निवडून आलेल्या सरपंचांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी जुन्या सरपंचांचा कालावधी संपुष्टात आलेला नसल्यामुळे तेदेखील प्रभारी सरपंच आहेत. साधारणपणे २६ डिसेंबरपर्यंत या ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यकारिणीची पहिली बैठक होणार असल्याने तोपर्यंत जुनेच सरपंच कायम राहणार असले तरी ते नामधारी आहेत. यापूर्वी सरपंचांची निवड पहिल्या सर्वसाधारण सभेत व्हायची, आता मात्र ज्या दिवसी निकाल लागला त्याच दिवशी नवे सरपंच निवडून आले आहेत. मात्र त्यांना पूर्वीचे सरपंचांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरच प्रभार मिळणार आहे. मात्र यापुढील सरपंचपदासाठी ही प्रक्रिया बदललेली राहील. नव्या सरपंचाच्या कार्यकाळानुसार ही निवडणूक होईल.यावेळी मतमोजणीनंतर सदस्यांसह सरपंचदेखील निवडून आले आहेत. विशेष म्हणजे त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्रदेखील आयोगाच्याकडून प्राप्त झाले आहेत. म्हणजेच त्यांना आयोगाने सरपंचपदाचा दर्जा बहाल केला आहे. त्यामुळे गावाचा खरा कारभारी कोण, असा संभ्रम निर्माण झाला आहे.  उपसरपंच निवडीच्या बैठकीत सरपंच सभेचे अध्यक्षग्रामपंचायतीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सरपंच्यांना कार्यभार सोपविण्यात येणार आहे. याच दिवसी उपसरपंचाची निवडणूक होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी जरी पदसिद्ध सरपंच असले तरी निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक विभागाच्यांतर्गत महसूल विभागाचा अधिकाराच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या निवडणुकीत जर उपसरपंचपदाला समसमान मते मिळाली, तर निर्णायक मत देण्याचा अधिकार मात्र सरपंचालाच राहणार आहे.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार