शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

मध्य रेल्वेच्या ७९ रेल्वे स्थानकांवर ‘एक स्टेशन एक उत्पादन’

By गणेश वासनिक | Updated: November 26, 2023 11:30 IST

स्थानिक पातळीवर ६१ विविध लोकप्रिय उत्पादनाची विक्री, ओएसओपी लाभार्थ्यांना २.४७ कोटीचे उत्पन्न

अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने 'वोकल फॉर लोकल' व्हिजनला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक/स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ७९ रेल्वे स्थानकावर ६१ प्रकारच्या लोकप्रिय वस्तू, साहित्य विक्री नोंदणीकृत ओएसओपी केंद्रावर होत आहे. लाभार्थ्यांनी आतापर्यंत २.४६ कोटीचे उत्पन्न मिळवले आहे.

केंद्र सरकारच्या 'वोकल फॉर लोकल' व्हिजनला प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक/स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि उत्पन्नाच्या अतिरिक्त संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने भारतीय रेल्वेवर 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' (ओएसओपी) योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत समाजातील उपेक्षित घटक, स्वदेशी/स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन, विक्री आणि उच्च दृश्यमानता देण्यासाठी रेल्वे स्थानकांवर ओएसओपी आउटलेट दिले जातात. योजनेची सुरूवात  २५ मार्च २०२२  रोजी सुरू झाली आणि २१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण राज्यात  ७४ रेल्वे स्थानकांवर  ७९ ओएसओपी आउटलेट्सने आहेत. हे ओएसओपी स्टॉल्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद यांनी संपूर्ण रेल्वेमध्ये एकरूपतेसाठी डिझाइन केले आहेत. 

स्थानिक वस्तू, साहित्य विक्री'वन स्टेशन वन प्रोडक्ट' हे त्या-त्या ठिकाणासाठीचे वैशिष्ट्य आहे आणि त्यात स्थानिक जमातींनी बनवलेल्या कलाकृती, स्थानिक विणकरांच्या हातमाग, जगप्रसिद्ध लाकूड कोरीव काम, चिकनकारी आणि झारी-जरदोजी यांसारख्या हस्तकला, कपड्यांवरचे काम किंवा चहा, कॉफी आणि इतर प्रक्रिया केलेले मसाले यांचा समावेश आहे. अर्ध-प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ/उत्पादने या भागात स्वदेशी उगवले जातात. त्याच वस्तू, साहित्याची विक्री केली जाते.

बडनेरा येथील सांभारवडी, शेगावच्या उदबत्तीची विक्रीराज्यातील रेल्वे स्थानकांवरील ओएसओपी आऊटलेट्सवरील विविध उत्पादनांमध्ये अहमदनगर येथील केळी, द्राक्षे, पापड, लोणचे; बडनेरा येथील सांबरवडी; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे चामड्याची उत्पादने; चिंचवड येथील घरगुती अगरबत्ती, धूप, साबण,  फिनाइल;  चर्चगेट येथील चामड्याची उत्पादने;  गोरेगाव येथील खादी उत्पादने; इगतपुरी येथील हंगामी फळे आणि पपई, द्राक्षे, सफरचंद, लोणचे, पापड यासह हाताने बनवलेली कोल्हापुरी चप्पल;  कणकवली व कुडाळ येथे लाकडी खेळणी; लोणावळा येथे चिक्की व फज उत्पादने;  नाशिकरोड येथील पैठणी साड्या; पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती, कुमकुम, अगरबत्ती व इतर पुजेचे साहित्य; नागपूर येथील बांबूचे साहित्य;  परळ येथील टेक्सटाईल आणि हातमाग;  पिंपरी येथे हाताने बनवलेल्या पर्स बॅग (कागद आणि कापडापासून बनवलेल्या);  सातारा येथील कंदी पेढा; शेगाव येथील पापड; सोलापूर येथील सोलापुरी चादर, बेडशीट आणि टॉवेल; वापी आणि बोरिवली येथे वारली कला आणि हस्तकला; वसई रोड आणि नालासोपारा येथे सॉफ्ट टॉईज यांचा समावेश आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे