शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एक मोबाईल, दोन मुले, ऑनलाईन शिक्षण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST

कोरोनाच्या संकटकाळात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा बंद करण्यात आल्या. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस पालकांच्या मोबाईलवर गुहपाठ पाठवून नंतर विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेशित केल्यानंतर शासनस्तरावर पालकांकडूनही कौतुक झाले. पाल्यांच्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचे नाही, हे ओळखून पालकांनी सुरक्षिततेवर भर दिली.

ठळक मुद्देपालक त्रस्त : गावखेड्यात पायाभूत सुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनासह शिक्षण संस्थांनी ऑनलाइन वर्ग घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण अनेक शासकीय, खासगी शाळांमधील पालकांना मोबाईल घेणे परवडत नसल्याने 'हाती नाही मोबाईलची कळ अन् ऑनलाईनसाठी पळ' अशी अवस्था झाली आहे. अशा शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग कसे होणार, असा प्रश्न आहे. उपलब्ध साधनसामग्रीशिवाय ऑनलाइन वर्ग सुरू करण्याच्या निर्णयामुळे पालकांसह शिक्षकांचे हाल होऊ लागले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा बंद करण्यात आल्या. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस पालकांच्या मोबाईलवर गुहपाठ पाठवून नंतर विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेशित केल्यानंतर शासनस्तरावर पालकांकडूनही कौतुक झाले. पाल्यांच्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचे नाही, हे ओळखून पालकांनी सुरक्षिततेवर भर दिली. पण वारंवार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा उल्लेख करून ऑनलाईन वर्ग भरण्याचा मार्ग सुरू करण्याच्या मानसिकतेत असलेल्या शासनाला पालकांमध्ये असलेला गोंधळ अद्यापही स्पष्ट दिसत नाही.मोबाईलवर शिक्षकांनी पाठवलेले व्हिडीओ बघा आणि मुलांना अभ्यास करायला सांगा ना! यात घरात एकच मोबाईल दोन मुले, अशी कौटुंबिक रचना असल्यामुळे मोबाईल कुणाकडे द्यायचा आणि त्यावर कुणी अभ्यास करायचा, या विचारातच पालकांचा वेळ वाया जात आहे. त्यातच मोठा मुलगा किंवा मुलगी नववी दहावीला शिकत असेल तर साहजिकच त्यांना प्राधान्य दिले जाते.मोबाईलला रेंज नाही!ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोबाईलच्या रेंजचा प्रॉब्लेम आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होते. पाऊस आणि वाºयामुळे येथे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे ऑनलाईन वर्गाचा ग्रामीण भागात फायदा नाही.ग्रामीण पालकांची मोबाइल घेण्याची ऐपत नाही. अशा स्थितीत ज्याकडे सुविधा त्यांनाच याचा फायदा होतो.त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे अडचणींमुळे नुकसान होते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण नुकसानाचे ठरते.- मोहन बैलकेशिक्षक

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण