धारणी : तालुक्यातील चिचघाट येथील १७ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टर उलटून जागीच मृत्यू झाला. बेरदाभुरू गावाजवळ मंगळवारी हा अपघात घडला. रोहित अशोक धांडे असे मृताचे नाव आहे.
चिचघाट गावातील रहिवासी रघु काकडे (४०) हा मदतनीस रोहित धांडे याला घेऊन आरजे २१ आरजी ७४७८७ क्रमांकाचा ट्रॅक्टर घेऊन मंगळवारी सकाळी ६ वाजता लगतच्या बेरदाभुरू गावाजवळील तलावाकडे निघाला होता. तेथील चढावावर चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर उलटत असल्याचे लक्षात येताच चालकाने उडी घेतली. मात्र, १७ वर्षीय रोहितचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील अशोक धांडे यांनी रघु काकडेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. धारणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------------