शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत एक क्लिक अन् सौरभने गमावले २.६० लाख; मुव्ही रेटींगच्या नावावर फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 13:24 IST

सौरभ वानखडे हे गुगलवर जॉब सर्च करीत होते. ते करत असताना त्यांना व्हॉट्सॲपवर लिंक पाठविण्यात आली.

अमरावती येथील एका व्यक्तीला ‘मुव्ही रेटिंग’ व्यवसायात गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देऊन सायबर गुन्हेगारांनी २.६० लाख रुपयांनी ऑनलाईन लुटले. तक्रारदाराला सुरुवातीला उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले आणि नंतर त्यांना पैसे देण्यास भाग पाडले गेले. तक्रारकत्याला टास्क देण्यात आला.

५ मे ते १४ मे दरम्यान फसवणुकीची ही घटना घडली. याप्रकरणी सौरभ लक्ष्मण वानखडे (रा. राठीनगर) यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी एका अज्ञाताविरूध्द फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. ५ मेच्या पुढील आठवड्यांत, त्यांना आणखी मोठी रक्कम भरायला सांगितली आणि त्यांनी सुरुवातीला चांगल्या परताव्याच्या अपेक्षेने पेमेंट केले त्यानंतर, जास्त कमिशन मिळविण्यासाठी आणि सुरुवातीची गुंतवणूक परत मिळवण्यासाठी कॉलरने त्यांना पैसे देण्यास भाग पाडायला सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले.काय घडले?

सौरभ वानखडे हे गुगलवर जॉब सर्च करीत होते. ते करत असताना त्यांना व्हॉट्सॲपवर लिंक पाठविण्यात आली. लिंकवर क्लिक करून सौरभ यांनी जॉबबाबत संपूर्ण माहिती भरली. मात्र, पलिककडून जॉब उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले. त्याच लिंकमध्ये एन्टरटेन्मेन्ट हे ऑपरेशन देण्यात आले. फिर्यादी यांनी ते निवडले असता बालाजी टेलीफिल्म ऑनलाईन रेटिंग व टास्कबाबत माहिती दिल्या गेली.

पुन्हा आली लिंक

अनोळखी मोबाईलधारकाने सौरभ वानखडे यांना पुन्हा एक लिंक पाठवून बॅंक अकाऊंटबाबत माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर मुव्ही रेटिंग, सिरिज रेटिंग, टास्क खेळण्याचे सुचविले. त्यापोटी कमिशन देण्याचे आमिष देखील दिले. पुन्हा वेगवेगळी कारणे सांगून सौरभ यांना टास्क खेळण्यास प्रवृत्त करण्यात आले. वेगवेगळ्या अकाऊंटवर पैसे भरण्यास सांगून यात त्यांची २ लाख ५९ हजार ६१४ रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी