लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या संक्रमणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने ३१ मार्चपर्यंत शाळा बंद, शिक्षकांचीही ५० टक्के रोटेशननुसार डयुटी लावली. आता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १५४९ शाळांमधील इयत्ता १ ते ८ तील १ लाख १५ जार ७२९ विद्यार्थी, तर आदिवासी विकास विभागाच्या शाळांतील ११,७०१ व महापालिकेच्या ६६ शाळांतील ९ हजार असे एकूण १ लाख ३६ हजार ४३० विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची शाळा २६ जूनला सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी राज्य शासनाने सर्वात प्रथम शाळांकडे लक्ष वेधले. शाळेत विद्यार्थी एकत्र येऊ नये म्हणून राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या कामात असलेल्या शिक्षकांनी व्यतिरिक्त इतर शिक्षकांच्या रोटेशननुसार ड्युटी लावली. कोरोनाच्या संक्रमणावर अंकुश लावण्यासाठी शासनाने ३१ मार्चची 'डेडलाईन' दिली आहे. त्यानंतर शाळा सुरू होईल की नाही, हे कोरोनावर कितपत नियंत्रण आणेल, त्यावर निर्भर आहे. पण तरीही शालेय विद्यार्थ्यांना त्यांची लागण होऊ नये म्हणून शासनाने ३१ मार्चनंतर विद्यार्थी शाळेत येऊ नये यासाठी १ ते ८ वर्गाच्या परीक्षा रद्द करून सरळ उत्तीर्ण केलेले आहे. मात्र इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा होणार आहेत. पणत्याही ३१ मार्चनंतरच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा घेतलेला निर्णय हा सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहे. पालकांनी सुट्ट्या लागल्यामुळे कुठलेही प्लॅनिंग न करता विद्यार्थी कसा सुरक्षित राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सतर्कता बाळगणे स्वच्छता राखणे, हा एकमेव उपाय असल्यामुळे पालकांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला दिला जात आहे.मूल्यमापन पद्धतीने निकालसाकारीत आणि आकारीत या आधारे मूल्यमापन करून पहिली ते आठवीचा निकाल लावला जाईल. परंतु, ३१ मार्चनंतर या विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागेल की नाही याबाबत अद्याप निश्चित सांगता येणार नाही, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी सांगितले.
दीड लाख विद्यार्थी परीक्षेविना होणार उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST
कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी राज्य शासनाने सर्वात प्रथम शाळांकडे लक्ष वेधले. शाळेत विद्यार्थी एकत्र येऊ नये म्हणून राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या कामात असलेल्या शिक्षकांनी व्यतिरिक्त इतर शिक्षकांच्या रोटेशननुसार ड्युटी लावली.
दीड लाख विद्यार्थी परीक्षेविना होणार उत्तीर्ण
ठळक मुद्देकोरोनाचे संक्रमण । प्रतिबंधासाठी शासनाने घेतला निर्णय