शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तिरडी बांधली अन्.. ८० वर्षीय वृद्ध महिला जिवंतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 01:22 IST

पटेल नगरातील उच्चभु्र वस्तीतील एका सदनिकेत राहणाऱ्या एका कुटुंबातील ८० वर्षीय वृद्धाचे निधन झाले. अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण करून तिरडी बांधण्यात आली, अन..वृद्ध महिलेची हालचाल झाल्याचे लक्षात आले. डॉक्टरांच्या तपासणीत ती वृद्धा ब्रेनडेड असल्याचे समजले.

ठळक मुद्देसाईनगरलगतच्या पटेलनगरातील प्रकार : मृत्यूबाबतची गोपनियता पाहून नागरिकांना संशय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पटेल नगरातील उच्चभु्र वस्तीतील एका सदनिकेत राहणाऱ्या एका कुटुंबातील ८० वर्षीय वृद्धाचे निधन झाले. अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण करून तिरडी बांधण्यात आली, अन..वृद्ध महिलेची हालचाल झाल्याचे लक्षात आले. डॉक्टरांच्या तपासणीत ती वृद्धा ब्रेनडेड असल्याचे समजले. मात्र, कुटुंबीय घरात दडून बसलेल्याचे पाहून नागरिक सभ्रंमात पडले होते.पटेलनगरातील तिरुपती अपार्टमेंट येथील रहिवासी बजरंग खंडेलवाल यांच्या कुटुंबीयात आई, एक भाऊ व एक बहीण राहतात. दोन दिवसांपासून खंडेलवाल यांची ८० वर्षीय आई वृद्धाकाळाने निद्रीस्त अवस्थेत होत्या. काय झाले काय नाही, हे कळण्यासाठी डॉक्टरांना बोलाविण्यात आले. वृद्धाचे निधन झाल्याचे कळताच नातेवाईकांसह शेजारी व मित्र मंडळींनी अत्यंसंस्काराची तयारी केली. तिरडी बांधण्याचे काम सुरू होते, तर एकीकडे वृद्धाला आंघोळ घालण्याची तयारी सुरू होती. दरम्यान वृद्धाची हालचाली झाल्याचे लक्षात आले. अंत्यसंस्कार केला नाही, त्यामुळे शेजाºयासह परिसरातील नागरिक संभ्रमात पडले. ते विचारपुस करायला जायचे, मात्र, घरात येऊ दिल्या जात नव्हते. त्यामुळे नागरिकांचा वेगळाच संशय आला. खंडेलवाल यांच्या आईचे निधन झाल्याची चर्चा परिसरात सुरू होती. शेजाºयापाजाºयासह परिसरातील नागरिक खंडेलवाल यांच्या घरात जाऊन डोकावण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांना घरात शिरण्यास मज्जाव केला जात होता. दरम्यान कुटुंबियांनी काही परिचितांना फोन करून सल्ला घेतला. वृध्देला मुंबईला हलविण्याची तयारी दाखविली. नागरिकांमधील उलटसुलट चर्चा पाहून अखेर बजरंग खंडेलवाल यांनी वृध्द आईला डॉ. अतुल यादगिरेकडे दाखविण्याची तयारी केली. चारचाकी वाहनात वृद्ध आईला घेऊन ते थेट मुंबईकडे रवाना झाले. यासंदर्भात नगरसेविका मंजूषा प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क केला असता, खंडेलवाल यांच्या आईची प्रकृती अत्यवस्थ असल्याने नुकतेच तिरुपती अपार्टमेटच्या तळमजल्यावर राहायला आले. ते आईची सेवा करीत होते. डॉक्टरने चुकीचे निदान दिल्यामुळे आम्ही अत्यंसंस्काराची तयारी केल्याचे खंडेलवाल म्हणत असल्याचे जाधव यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य