शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

ऑक्सिजन न मिळाल्यानं वृद्धाचा मृत्यू; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 22:23 IST

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नातेवाइकांनी घातला गोंधळ 

अमरावती : न्यूमोनिया झालेल्या वृद्धाच्या उपचारात ऑक्सिजनचा वापर न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घातला. रमेश रामचंद्र बोबडे (६५, रा.  पूर्णानगर) असे मृताचे नाव आहे. त्यांना पीडीएमसीमधील ‘सारी’ वॉर्डातील अतिदक्षता विभागात मंगळवारी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती नाजूक असताना व डॉक्टरांना  वारंवार सांगूनही रुग्णाला योग्यवेळी ऑक्सिजन मिळाला नसल्याचा नातेवाइकांचा आक्षेप आहे. रविवारी सांयकाळी ७ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त नातेवाइकांनी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी यांच्या दालनात गोंधळ घातला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन  गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक राम कदम, पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह ताफा रुग्णालयात पोहोचला. रुग्णाला ऑक्सिजनची गरज होती. मात्र, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचे पुतणे प्रवीण बोबडे यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाइकांनी लावून धरली. काही नातेवाइकांनी डॉ. सोमवंशी यांच्याकडे रोख करून शिवीगाळ केली. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना शांत केले. नेमका काय प्रकार घडला, याची चौकशी करण्यात येईल, असे सांगून पोलीस बंदोबस्तात सारी वॉर्डात भेट देऊन चौकशी केली. नातेवाईकांची अधिष्ठात्यांसोबत बंद दाराआड चर्चासंतप्त नातेवाइकांनी अधिष्ठाता सोमवंशी यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. यावेळी पोलीसही उपस्थित होते. डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवीण बोबडे, टिनू काटोलकर, निशांत अग्रवाल, सतीश देशमुख यांनी केली. खासगी डॉक्टरांचा नकारछातीत कफ दाटल्याने अस्वस्थ झालेले रमेश बोबडे यांना तातडीने उपचाराकरिता खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. परंतु, एकाही खासगी हॉस्पिटलने दाखल करून घेतले नाही. अखेर त्यांना मंगळवारी पीडीएमसीमध्ये आणण्यात आले. कोरोनाची रॅपिड अँटिजन टेस्ट ही निगेटिव्ह आली. त्यानंतर सारीचा संशयित म्हणून त्यांना या वॉर्डात ठेवण्यात आले. मात्र, त्याबाबत टेस्ट निगेटिव्ह आली. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने मृत्यू झाल्याची भावना पुतणे सुधीर बोबडे यांनी व्यक्त केले.