आंदोलन चिघळले : शेतकऱ्यांची ‘वज्रमूठ’ कायमच, जिल्हाभरात उद्रेक धग कायमचजिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर फेकला भाजीपाला लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विविध मागण्यांसाठी ुसुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानासमोर निर्दशने केली. संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानांसमोर फळे, भाजीपाला फेकून रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, उत्पादनास किमान हमीभावया प्रमुख मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या निवासस्थानासमोर उग्र निदर्शने करून शासनाविरोधातील रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढावू, प्रवीण मोहोड, विलास आसोले, अंकुश कडू, मंगेश फाटे, निखिल बोके, प्रशांत शिरभाते, दिनेश आमले, सुधीर मेटे, अतुल ढोके आदी उपस्थित होते.युवक काँग्रेस-पोलिसांमध्ये धक्काबुक्कीतहसील कार्यालयात आंदोलन : सहा जणांची अटकेनंतर सुटकाअमरावती : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तहसील कार्यालयाला कुलूप ठोकण्याकरिता गेलेल्या युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याने मंगळवारी दुपारी खळबळ उडाली. कोतवाली पोलिसांनी सहा कार्यकर्त्यांना अटक केली होती. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अमरावती लोकसभा युकाँचे अध्यक्ष सागर देशमुख यांच्यासह पंकज देशमुख, मुकेश लालवाणी, दिलीप सोनोने, अभिनव देशमुख, वीरेंद्र जाधव, सागर कलाने, आशिष यादव, गणेश साखरकर, सागर यादव, आशिष भातकुले आदी कार्यकर्ते मंगळवारी तहसील कार्यालयात पोहोचले. कोतवाली पोलिसांनी कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर अडविले. तहसीलदारांना भेटण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना मज्जाव केला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एसडीओ कार्यालयात धाव घेतली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी कार्यकर्ते व पोलीस समोरासमोर आले व धक्काबुक्की झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तासभर एसडीओ कार्यालयात ठिय्या दिला. पोलिसांनी सहा कार्यकर्त्यांना अटक केली. ‘आप’चा जिल्हा परिषदेवर ‘हल्लाबोल’लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठवडाभरापासून राज्यातील शेतकरी कर्जमाफी व अन्य मागण्यासाठी संपावर गेले आहेत. मंगळवारी आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शासकीय कार्यालयांना ‘टाळे ठोको’ आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षाला टाळे लावण्याचा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा डाव पोलीस प्रशासनाने उधळून लावला. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.पोलिसांची दमछाकअमरावती : आम आदमी पक्षाने ६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शिरून कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने आपचा डाव उधळला गेला. पश्चात आपच्या कार्यकर्त्यानी पोलिसांना चकमा देत जिल्हा परिषदेकडे धाव घेतली व थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, याठिकाणी पोलीस तैनात असल्याने ‘आप’ला आंदोनल करता आले नाही. मात्र, कार्यकर्त्यांनी शासनविरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी आम आदमी पक्षाच्या १२ कार्यकर्त्यांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये रंजना मामर्डे, संतोष रंगे, महेश देशमुख, अलिम पटेल, रोशन अर्डक, अशोक वानखडे, किरण गुळदे, प्रमोद कुचे, संजय राऊत, किशोर वानखडे आदींचा समावेश आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकमा देत जिल्हा परिषदेचे मुख्यालय गाठले. धावत सुटलेले कार्यकर्ते पाहून कार्यालयात काम करणारे अधिकारी, कर्मचारी सुद्धा भांबावून गेले होते.शेतकरी करणार टॉवरचे नुकसानलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सहा दिवसांपासून पोटतिडकीने आंदोलने करूनही शहरी भागातील जनतेला आणि शासन-प्रशासनाला शेतकऱ्यांची किंमत कळत नसल्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचलेले शेतकऱ्यांचे काही गट मोबाईल टॉवरचे नुकसान करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत मोबाईलचे टॉवर उभारण्यात आलेले आहेत. या टॉवरवरील यंत्रणा अवरुद्ध केल्यास मोबाईलचे नेटवर्क प्रभावित होईल, खंडित होईल. इंटरनेट, व्हाट्सअॅप बंद होईल. शेतकऱ्यांच्या गंभीर मुद्याची जाण त्यामुळे शहरी जनतेला आणि अधिकाऱ्यांना होईल, असा विश्वास या नव्या आंदोलनाची रणनिती आखणाऱ्या शेतकरी गटांना आहे. मंगळवारी यासंबंधाने काही शेतकऱ्यांची बैठक अमरावतीत पार पडली. तालुका पातळीवर यासंबंधाने नियोजन आखणे सुरू आहे. नेमके काय केले म्हणजे नेटवर्क खंडित होईल, याचा तांत्रिक तपशीलही शेतकऱ्यांनी समजून घेतला. रणनितीची अंमलबजावणी कशी होते, हे कळेलच.
अधिकाऱ्यांची घरे ‘टार्गेट’
By admin | Updated: June 7, 2017 00:05 IST