शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराच्या निर्णयाची ‘खिचडी’

By admin | Updated: August 3, 2014 23:04 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खिचडीच्या कामातून सरकारचा आदेशही मुख्याध्यापकांची सुटका करु शकलेला नाही. शालेय पोषण आहाराची जबाबदारी, मुख्याध्यापकांकडून

भट्टीवर राबताहेत मुख्याध्यापक : नव्या आदेशाची डाळ शिजेना! अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खिचडीच्या कामातून सरकारचा आदेशही मुख्याध्यापकांची सुटका करु शकलेला नाही. शालेय पोषण आहाराची जबाबदारी, मुख्याध्यापकांकडून काढून घेऊन बचत गटांना देण्याचे आदेश सरकारने देऊन मुख्याध्यापकच आहाराचे काम करीत आहेत. शालेय पोषण आहार राबविण्याचे भाराभर आदेश निघाले असेल तरी प्रत्यक्षात मात्र खिचडी मुख्याध्यापकांचा पिच्छा सोडायला तयार नाही. ग्रामीण भागातील शाळातील विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार देण्याची योजना राज्य सरकारने सुरु केली. या योजनेच्या अमंलबजावणीची सर्व जबाबदारी मुख्याध्यापकावर टाकली होती. आधीच कामाचा ताण वाढत असताना त्यात नव्या डोकेदुखीची भर पडल्याने मुख्याध्यापकांनी पोषण आहाराचे काम करण्यास विरोध केला होता. त्यामुळे ही योजना राबविण्याची सर्व जबाबदारी बचत गटाकडे देण्याचे सरकारने मागील फेब्रुवारी महिन्यात जाहीर केले होते. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. काही ठिकाणी बचत गटांची निवड करण्यात आली. तर काही ठिकाणी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशाची माहितीच शाळांना दिली नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. यासंदर्र्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी यांना निवेदनही देण्यात आले. बचतगटांच्या निवडी होणे बाकी आहे. सरकारच्या आदेशात योजना राबविण्याची मार्गदर्शक तत्त्वे दिलेली नाहीत. तांत्रिक कामे पूर्ण नाहीत, या कारणांमुळे योजनांची अंमलबजावणी पूर्ण रखडली आहे. त्यामुळे भाजीपाला आणण्यापासून खिचडी मुलांना देण्यापर्यंत सर्व कामे मुख्याध्यापकांनाच करावी लागत आहेत. पोषण आहार योजनेचे अनेक आदेश निघूनही मुख्याध्यापक भट्टीवर राबत असल्याचे चित्र आहे.