शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

सालनापूर येथील पोषण आहार राष्ट्रीय स्तरावर, युनिसेफनी घेतली दखल; अवलिया शिक्षकाच्या प्रयत्नाला यश

By गणेश वासनिक | Updated: September 4, 2022 18:12 IST

दोनशे लोकवस्तीच्या गावातील जिल्हा परिषद शाळेचा युनिसेफकडून बहुमान.

प्रत्येक भिंतीवर विद्यार्थ्यांच्या नावाने सुविचार, कोट, सूट बूट परिधान करून कॉर्पोरेट जगतासारखा दररोज विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश, जगाच्या पाठीवर दैनंदिन घडणाऱ्या प्रत्येक बाबीची माहिती एवढेच नव्हे तर परिसरातील असलेल्या परसबागेतून वर्षभर सर्वंकष पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्याचे काम एका जिद्दी व अवलिया शिक्षकाने देऊन शाळेचे रूपडे बदलविले. अखेर युनिसेफने या बाबीची दखल घेत सर्वोत्कृष्ट शाळेचा बहुमान दिला.

तालुक्यातील दोनशे लोकवस्तीचे गाव सालनापूर. येथील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत असलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक मराठी शाळा ज्ञानरचनावादी, परसबाग, कृतियुक्त शिक्षण, मुलांची गुणवत्ता, पालकांचा सहभाग, सकस आहार-सुदृढ बालक अशा एकापेक्षा एका उपक्रमांनी येथील शिक्षक विनोद राठोड यांच्या पराकाष्ठेने ही शाळा राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली आहे.

मेळघाटातील आलाडोह येथून सन २०१७ मध्ये विनोद राठोड यांची बदली सालनापूर येथे झाली आणि रात्रीला गुरे बसणाऱ्या या शाळेचे रूपडे पूर्णतः बदलले. मुलांची गुणवत्ता शंभर टक्के वाढवण्यासाठी ज्ञानरचनावादी उपक्रम राठोड यांनी राबविला. परसबाग निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात पालेभाज्यांचा समावेश झाला आहे. पुस्तकात वाचल्या जाणाऱ्या फुलांची लागवड करून प्रत्यक्षात मुलांना त्यावर आधारित माहिती दिली जाते.

सुटाबुटातील शाळाजिल्हा परिषदेची शाळा असली तरी काॅर्पोरेट जगतासारखे येथील विद्यार्थी राहतात. अंगात सूट बूट दिला, आता इतर मुलांप्रमाणे हुशारीही असली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त झाली. त्यावर कार्य झाले. त्यामुळे जगात दैनंदिन घडणाऱ्या प्रत्येक बाबीची माहिती येथील विद्यार्थ्यांना आहे. संगणक ज्ञानातही येथील विद्यार्थी पारंगत झाले आहेत.

शाळाबाह्य मुलांना आधारदिवाळी असो की दसरा, प्रत्येक सण विद्यार्थ्यांसोबत शाळेत साजरा करायचा आणि रविवारसह सुटीच्या दिवशी शाळाबाह्य मुले शोधायची आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे, या उपक्रमात ४० शाळाबाह्य मुलांना विनोद राठोड यांनी शोधून शिक्षण प्रवाहात आणले. शिक्षक रितेश उमरेडकर व साधन व्यक्ती धीरज जवळकार यांची मदतही त्यांना लाभली आहे.

सालनापूर येथील प्रत्येक विद्यार्थी सूट बुटात येतो. उत्कृष्ट पोषण आहारामुळे ही शाळा राष्ट्रीय स्तरावर पोहचली आहे. या शाळेचा आम्हाला अभिमान आहे.-मुरलीधर राजनेकरगटशिक्षणाधिकारी, पं. स. धामणगाव रेल्वे

टॅग्स :Amravatiअमरावती