शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘कॉन्टॅक्ट लिस्ट’मधील व्यक्तींना पाठविले न्यूड छायाचित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

रिंगरोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने ७ एप्रिल रोजी प्ले स्टोअरहून कॅश ॲडव्हान्स पाॅकीट नामक ॲप डाऊनलोड केले. त्यातून सात दिवसांच्या मुदतीवर ३ हजार ५५९ रुपये ऑनलाईन कर्ज घेतले. कर्जावू घेतलेली रक्कम ती आठवड्याभराच्या आता भरू शकली नाही. दरम्यान, १३ एप्रिल रोजी तिला एक मोबाईल कॉल आला. त्या मोबाईलधारकाने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करून त्या महिलेने ३७९६ रुपये भरले. तरी देखील वेगवेगळ्या क्रमांकाहून रक्कम भरली नाही, म्हणून तिला वारंवार कॉल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठवड्यासाठी घेतलेले ऑनलाईन कर्ज विहित मुदतीत न भरल्याने एका महिलेच्या छायाचित्रांचे मार्फिंग करून ती ‘न्युड’ छायाचित्रे तिच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना पाठविल्याची धक्कादायक घटना वरूड येथे उघड झाली. ऑनलाईन कर्जाची परतफेड वेळेत न केल्याने कर्जदार महिलेच्या छायाचित्रात आक्षेपार्ह बदल करून ती सोशल व्हायरल करण्यात आली. विशेष म्हणजे, अशा प्रकारची शहर व जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे. त्याला पोलिसांनी दुजोरा दिला. १३  ते ३० एप्रिलदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी एका ३८ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून ३० एप्रिल रोजी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ५०० व आयटी ॲक्टच्या कलम ६६ ड, ६७, ६७ अ अन्वये गुन्हा दाखल केला. रिंगरोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने ७ एप्रिल रोजी प्ले स्टोअरहून कॅश ॲडव्हान्स पाॅकीट नामक ॲप डाऊनलोड केले. त्यातून सात दिवसांच्या मुदतीवर ३ हजार ५५९ रुपये ऑनलाईन कर्ज घेतले. कर्जावू घेतलेली रक्कम ती आठवड्याभराच्या आता भरू शकली नाही. दरम्यान, १३ एप्रिल रोजी तिला एक मोबाईल कॉल आला. त्या मोबाईलधारकाने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करून त्या महिलेने ३७९६ रुपये भरले. तरी देखील वेगवेगळ्या क्रमांकाहून रक्कम भरली नाही, म्हणून तिला वारंवार कॉल करण्यात आले.

अन् तिला धक्काच बसलाआरोपीने ऑनलाईन कर्जाची प्रोसेस करून घेतानाच महिलेच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्ट चोरीने ‘कॉपी’ करून घेतली. त्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना महिलेचे मार्फ केलेले नग्न छायाचित्रे पाठविली. अगं, तुझी काही आक्षेपार्ह छायाचित्रे आम्हाला आलीत, असे एका परिचिताने सांगितल्यावर तिला धक्काच बसला. विशेष म्हणजे, ३५५९ रुपयांच्या कर्जाच्या मोबदल्यात १० हजार रुपये भरल्यानंतरही आरोपीने तिला त्रस्त करून सोडले आहे. आरोपीने आपले नग्न फोटो तयार करून आपली बदनामी केल्याची फिर्याद तिने नोंदविली. 

काय आहे माॅर्फिंग?मुळात फोटोंचे मॉर्फिंग करणे किंवा अशा प्रकारे मॉर्फिंग करून व्हिडिओ तयार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. सर्वसाधारणपणे सांगायचे झाले तर मॉर्फ करणे म्हणजे एडिट करून त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे. एखाद्याच्या फोटोवर दुसऱ्याचा चेहरा मॉर्फ केला जातो, याला फेस मॉर्फिंग असे म्हणतात. सध्या उपलब्ध असलेली विविध सॉफ्टवेअर्स आणि मोबाइल ॲपच्या साह्यानं असे मॉर्फिंग करणे सहज शक्य झालं आहे. सायबर मॉर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून, अवमानना होईल अशा प्रकाराने मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइट वा सोशल मीडियावर रिपोस्ट किंवा अपलोड केली जातात. 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमSocial Mediaसोशल मीडिया