शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

आता घरबसल्या मिळणार गंगाजल; पोस्टाने आणली गंगाजल योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 11:50 IST

भाविकांसाठी सुविधा : जवळच्या पोस्टातून घ्यावे गंगाजल

श्यामकांत सहस्त्रभोजने लोकमत न्यूज नेटवर्क बडनेरा : धार्मिक कामांसाठी गंगाजलचे महत्व आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गंगा नदीचे जल पवित्र मानले जाते. अनेक धार्मिक विधींमध्ये गंगाजलला विशेष महत्त्व आहे. पवित्र गंगाजल आणण्यासाठी आता भाविक भक्तांना गंगोत्री किंवा ऋषिकेशला जाण्याची गरज नाही.

डाक विभागामार्फत गंगोत्री येथील बाटलीबंद गंगाजल उपलब्ध करून दिले जाते. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक पोस्ट ऑफिसमधून गंगाजल तुम्ही मिळवू शकता, ऑनलाइनदेखील मागवू शकता. २५० मिली गंगाजलच्या बॉटल या पोस्ट ऑफिस कार्यालयात उपलब्ध आहेत.

पोस्टाने आणली गंगाजल योजना... तुमच्या घरापासून जवळच्या कुठल्याही पोस्ट ऑफिसमधून तुम्ही गंगाजल मागवू शकता, तसेच https://epostoffice.gov.in या संकेतस्थळावर खाते उघडून आपली मागणी नोंदवू शकता.

३० रुपयांमध्ये २५० मिली गंगाजलच्या २५० मिली बॉटलसाठी ३० रुपये आकारले जातात. घरपोचही गंगाजलची बॉटल मिळते. त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात. 

या वर्षात ३२९ घरात पोहोचले गंगाजल... पोस्टाच्या माध्यमातून अमरावतीत एप्रिल २०२४ ते डिसेंबर महिन्यापर्यंत ३२९ भाविकांनी गंगाजलाची मागणी केली आहे.

गंगाजल ऑनलाइन ऑर्डर करता येते का? गंगाजल ऑनलाइन ऑर्डर करता येते. त्यासाठी पोस्टाच्या वेबसाइटवर भेट देऊन नोंदणी करावी लागते. यानंतर घरपोच गंगाजल पुरविल्या जाते. परंतु त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

श्रावणात होती मागणी श्रावण महिना हा पूजाअर्चा करण्याचा महिना असतो. अनेक जण या महिन्यात अभिषेक करतात. त्यामुळे या महिन्यामध्ये गंगाजलाची मागणी वाढली असते.

तुम्हालाही गंगाजल हवंय ! काय कराल? गंगाजल मागविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नोंदणी करावी लागते किंवा पोस्टाच्या वेबसाइटवर मागणी नोंदविता येते.

गंगाजलला नागरिकांचा प्रतिसाद... "गंगाजलला विशेष महत्त्व प्राप्त आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पोस्टाने ही योजना सुरू केली आहे. ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष पोस्ट ऑफिसमधून तुम्ही गंगाजल घेऊ शकता. नागरिकांचा या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे."- सुजित कुमार लांडगे, प्रवर पोस्ट मास्तर, मुख्य डाकघर अमरावती.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसAmravatiअमरावतीgovernment schemeसरकारी योजना