शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

आता लालपरी धावू लागली पूर्ण क्षमतेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

लॉकडाऊननंतर २० ऑगस्टपासून एसटी सेवा सुरू करण्यात आली. पण तेव्हापासून प्रत्येक आसन क्षमतेचे निर्णयक्षमतेवर म्हणजेच प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसला पाहिजे, असा नियम घातला होता. त्यामुळे एसटीला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. परंतु शुक्रवार, १८ सप्टेंबरपासून पूर्ण सक्षमतेने एसटी बसेस धावत आहेत. प्रत्येक प्रवाशांच्या चेहऱ्याला मास्क आणि सोबत सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देएसटी महामंडळ : जिल्ह्यातील आठ आगारांतून अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :सर्वसामान्यांची जीवन वाहिनी असलेल्या ‘लालपरी’ची रुतलेली चाके आता धावू लागली आहे. आतापर्यंत अपूर्ण क्षमतेने धावणाऱ्या बसमधून आता पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी मिळाली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून याबाबतचे आदेश काढले असून, जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.लॉकडाऊननंतर २० ऑगस्टपासून एसटी सेवा सुरू करण्यात आली. पण तेव्हापासून प्रत्येक आसन क्षमतेचे निर्णयक्षमतेवर म्हणजेच प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसला पाहिजे, असा नियम घातला होता. त्यामुळे एसटीला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. परंतु शुक्रवार, १८ सप्टेंबरपासून पूर्ण सक्षमतेने एसटी बसेस धावत आहेत. प्रत्येक प्रवाशांच्या चेहऱ्याला मास्क आणि सोबत सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. विभागातील ८ आगारांमधून सध्या जवळपास ४०० बसफेऱ्या धावत आहेत. प्रत्येक बसमध्ये २२ प्रवाशांनी प्रवास करणेबाबत नियम असल्याने काही मार्ग सोडले तर अनेक मार्गावर एसटी तोट्यात जात होती. त्यामुळे नुकसान होत होते. प्रशासनाच्या या निर्णयामुळे एसटीला फायदा होणार आहे. विभागीय नियंत्रकांनी अमरावती, बडनेरा, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, परतवाडा, चांदूर रेल्वे, दर्यापूर या आठ एसटी आगारांमधून पूर्ण क्षमतेने बसेस सुरू करण्यास परवानगी दिली आहे.पाच महिने थांबली होती चाकेकोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरूवात झाल्यानंतर रस्त्यावरून धावणारी एसटी जागेवरच थांबवावी लागली. तब्बल पाच महिन्यांपासून लालपरी बंद ठेवल्याने महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत संपले होते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी प्रवासी सेवेसोबतच महामंडळाला मालवाहतूक सुरू करावी लागली.राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसेस आता पूर्ण प्रवाशी क्षमतेने चालविण्यास परवानगी दिली आहे.त्यानुसार विभागातील आठही आगारांमधून २२ ऐवजी पूर्ण क्षमतेने बसव्दारे प्रवासी वाहतूक केली जात असून, प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर वापर अनिवार्य केले आहे.- श्रीकांत गभणे,विभाग नियंत्रण

टॅग्स :state transportएसटी