लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मतदाराची ओळख पटविण्यासाठी यापूर्वीच्या मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त १७पुराव्यांचा आदेश १४ जुलै रोजी आयोगाने रद्द केले आहेत. आता मतदान ओळखपत्राव्यतिरिक्त १२ पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत १७कागदपत्रे सादर करण्याची परवानगी आयोगाने ८ नोव्हेंबर २०११ च्या आदेशाने दिली होती. मात्र, १२ पुरावे ग्राह्य धरण्याचे आदेश १७ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेले आहेत. मतदान केंद्र अध्यक्षांद्वारे प्रथम सचित्र निवडणूक ओळखपत्र सादर करण्यास सांगण्यात येईल. असे ओळखपत्र उपलब्ध नसल्यास किंवा त्या मतदाराची ओळख पटत नसल्यास १२ पैकी कोणताही पुरावा सादर करूनच मतदान पार पाडता येईल.
तर करता येईल मतदानस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या यादीत मतदाराच्या नावासमोर फोटो किंवा चुकीचा मजकूर असल्यास सुधारणा करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीत. मात्र, अशा मतदाराची ओळख या १२ पुराव्यांच्या आधारे होत असल्यास, त्या मतदाराला मतदानाची परवानगी देण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
आता हे १२ पुरावे धरणार ग्राह्यभारताचा पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची फोटो असलेली ओळखपत्रे, बँक, पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक, सक्षम प्राधिकाऱ्याचा फोटोसहित अपंगत्वाचा दाखला, मनरेगा जॉबकार्ड, निवृत्ती वेतन विषयक फोटो असलेली कागदपत्रे, श्रम मंत्रालयाचे फोटोसहित आरोग्य कार्ड, स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र, आमदार, खासदारांचे ओळखपत्र