शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आता महाविद्यालय स्तरावर होणार दीक्षांत समारंभ, अमरावती विद्यापीठाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 17:00 IST

विद्यापीठ स्तरावर होणारा दीक्षांत समारंभ आता महाविद्यालय स्तरावर घेण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून होईल, अशी माहिती आहे.

 - गणेश वासनिक अमरावती - विद्यापीठ स्तरावर होणारा दीक्षांत समारंभ आता महाविद्यालय स्तरावर घेण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून होईल, अशी माहिती आहे.विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात आचार्य पदवी, गुणवत्ता यादीत स्थान पटकवणारे तसेच पारितोषिक विजेते अशा मोजक्याच विद्यार्थ्यांचा गौरव होतो. उर्वरित पदवीधरांना जागेवर उभे राहून पदवी मिळाल्याची घोषणा केली जाते. त्यानंतर एका रांगेत लिपिक दर्जाच्या कर्मचा-यांकडून पदवी दिली जाते. यामुळे प्रत्येक पदवीधराचा सन्मान व्हावा, यासाठी महाविद्यालय स्तरावर पदविदान समारंभाचे आयोजन करण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे. त्यामुळे समारंभात येणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा प्रवास खर्च, गैरसोय तसेच पदवीसाठी लागणारा खर्च थांबेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयास २१ आॅगस्ट २०१५ रोजी तत्त्वत: मान्यता प्रदान करण्यात आली आहे. दरम्यान, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदवी समारंभ यंदा २३ फेब्रुवारी रोजी होत आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना विद्यापीठात पदवी प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठ स्तरावर दरवर्षी होणाºया दीक्षांत समारंभात २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च येतो. दीक्षांत समारंभासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक जयंत वडते आदी चमू जोमाने कार्यरत आहे.

समारंभाचा खर्च विद्यापीठ देणारयेत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयस्तरावर होणाºया पदविदान समारंभाचा खर्च विद्यापीठाकडून विद्यार्थीनिहाय मिळेल. समारंभाचे स्वरूप, आयोजन, पाहुणे आदी बाबी प्राचार्यांना ठरवाव्या लागतील. 

लीड कॉलेजवर जबाबदारीची शक्यतामहाविद्यालय स्तरावर दीक्षांत समारंभ घेण्याबाबत एकमत झाले आहे. मात्र, जिल्ह्याच्या ठिकाणी लीड कॉलेजमध्ये समारंभाच्या आयोजनबाबतही मंथन सुरू आहे. 

महाविद्यालय स्तरावर पदविदान समारंभ आयोजनाबाबत नियमावली तयार करण्याची प्रक्रिया युद्धस्तरावर सुरू आहे. येत्या ८ ते १० दिवसांत नियमावली तयार होताच, त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. विद्यार्थ्यांचा सन्मान आणि अभिमान जोपासण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.- राजेश जयपूरकरप्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ