शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पहिलाच उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 21:07 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यावर्षीपासून महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार प्रदान करणार आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यावर्षीपासून महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार प्रदान करणार आहे. या प्रस्तावाला कुलगुरूंनी तत्त्वत: मान्यता दिली असून, त्याकरिता समिती गठित करण्यात आली आहे. उत्कृष्ट पदवी वितरणासाठी पुरस्कार देणारे राज्यात हे विद्यापीठ पहिले ठरणार आहे. विद्यापीठ अंतर्गत ३९४ महाविद्यालयांकडून या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले जाणार आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार प्रत्येक महाविद्यालयस्तरावर पदवी वितरण सोहळ्याचे आयोजन करणे हे अनिवार्य आहे. त्यानुसार संत  गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९ पासून महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर पदवी वितरण समारंभ आयोजनाबाबत मंजुरी दिली. मात्र, महाविद्यालये पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात माघारली आहेत. ३९४ पैकी १४४ महाविद्यालयांनीच पदवी वितरण समारंभ आयोजनाबाबत विद्यापीठाकडे अहवाल पाठविले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने उर्वरित २५० संस्थाध्यक्ष, प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. दरम्यान, महाविद्यालयांनी स्वयंस्फूर्तीने पदवी वितरण समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांचा गौरव करावा, यासाठी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी उत्कृष्ट पदवी वितरणासाठी पुरस्कार बहाल केला जाणार आहे. यात २०१९ या वर्षातील पदवी वितरण समारंभ ग्राह्य धरण्यात येणार आहे. महाविद्यालयांनी पाठविलेल्या पदवी वितरण समारंभ अहवाल पुस्तक रूपात तयार करण्याचे प्रस्तावित आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय आणि प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.

समिती तयार करणार नियमावली, अटी पुरस्काराच्या अटी, नियमावली तयार करण्याची जबाबदारी कुलगुरूंनी गठित के लेल्या समितीकडे सोपविली आहे. महाविद्यालयाचा परिसर, पदवी वितरणाचे स्वरूप, मान्यवरांची उपस्थिती, सामाजिक, शिक्षणक्षेत्राची व्याप्ती आदी बाबींचा यात समावेश असेल. समितीने तयार केलेला अहवाल परीक्षा मंडळ आणि पुढे व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयार्थ ठेवण्यात येणार आहे. एकदा व्यवस्थापन परिषदेने मान्यता प्रदान करताच महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण पुरस्कार देण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

महाविद्यालयस्तरावर पदवी वितरण समारंभाची व्याप्ती आणि त्याचे स्वरूप वाढीस लागावे, यासाठी पदवी वितरण पुरस्कार देण्याचा मानस आहे. कुलगुरूंनी त्यास मान्यता प्रदान केली आहे. आता काही औपचारिक बाबी शिल्लक असून, मेपर्यंत त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. महाराष्ट्र दिनी पुरस्कार वितरण केला जाणार आहे. - हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.