शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करांना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
4
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
5
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
6
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
7
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
8
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
9
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
10
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
11
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
12
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
13
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
14
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
15
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
16
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
17
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
18
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
19
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
20
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव

लग्नसमारंभात आता ५० जणांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST

सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने खुले लॉन, विनावातानुकूलन मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात विवाह समारंभ हा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडता येणार आहे. विशेष म्हणजे, लग्न समारंभात मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. विवाह समारंभात वर-वधूसह ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. खुले लॉन, मंगल कार्यालय उघडल्यानंतर तसेच हाताळण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण बंधनकारक आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्याचा आदेश : मंगल कार्यालये, हॉल, सभागृहातही होणार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊन व संचारबंदीत आता टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. यामध्ये आता विवाह समारंभासाठी ५० व्यक्तींना सहभागी होता येईल. मात्र, शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जारी केले.सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने खुले लॉन, विनावातानुकूलन मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात विवाह समारंभ हा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडता येणार आहे. विशेष म्हणजे, लग्न समारंभात मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. विवाह समारंभात वर-वधूसह ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. खुले लॉन, मंगल कार्यालय उघडल्यानंतर तसेच हाताळण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण बंधनकारक आहे. याशिवाय दर तीन तासांनी संबंधित कार्यालयाचे काऊंटर निर्जंतुकीकरण करावे. खुले लॉन, विनावातानुकूलन मंगल कार्यालये, सभागृहांत काम करणाºया कर्मचाऱ्यांनी लोकांचा संपर्क टाळावा व सर्वांनी हातमोजे, मास्क, हँडवॉश, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा आवश्यकता भासल्यास तसेच कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास तात्काळ संबंधित कर्मचारी, कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी. आजारी व्यक्तींना कामांवर ठेवू नये. मंगल कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एक मीटर अंतर ठेवणे बंधनकारक आहे. विवाह समारंभात येणाऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गापासून बचावाबाबत सूचना दर्शनी भागात लावण्यात याव्यात आदी अटी-शर्तींवर जिल्हाधिकाऱ्यांनी विवाह समारंभात ५० जणांना सहभागी करण्यास परवानगी दिली आहे. सहभागी व्यक्तींना आरोग्य सेतु अ‍ॅप वापरणे बंधनकारक आहे. कंटेमेंट झोनमधील कुठल्याही व्यक्तीला या समारंभात उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे आढळून आल्यास मनपा आयुक्त, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात तहसीलदार यांच्याकडून कारवाई केली जाणार आहे. कंटेनमेंट झोन परिसरात २०० मीटर अंतरापर्यतची सर्व लॉन, मंगल कार्यालये बंद राहतील.परवानगी घ्यावी लागणारवर-वधुपक्षाकडून आमंत्रित केलेल्या व विवाह समारंभात सहभागी होणाºया लोकांची यादी परवानगीसाठी शहरी भागात महापालिका आयुक्त, नागरी क्षेत्रात नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात तहसीलदार यांच्याकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. लग्न समारंभात गर्दी होऊन कोविड-१९ चा प्रादुर्भाव होणार नाही, या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांना देखरेख व नियंत्रण ठेवावे लागणार आहे.प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही संबंधित लॉन, मंगल कार्यालयाच्या संचालकांवर राहणार आहे. विवाह समारंभात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सभागृहात गर्दी झाल्यास याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला संचालकांनी द्यावी तसेच मंगल कार्यालय तात्काळ बंद करावे. असे न केल्यास प्रशासन ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’वर येऊन संबंधित लॉन, मंगल कार्यालय सील करण्याची प्रक्रिया पार पाडेल, असे या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :marriageलग्न