कुख्यात चोर नरेश भांगेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:00 AM2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:32+5:30

गेल्या वर्षात शहरात घरफोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी गुन्ह्यांचा छडा लावण्याचे निर्देश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, यशवंत सोळंके, शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस आयुक्त बी.डी. डाखोरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राम गिते यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई विकास रायबोले, जावेद अहेमद, अजय मिश्रा, दिनेश नांदे, मोहम्मद सुलतान, निवृत्ती काकडे, चालक प्रशांत नेवारे यांचे पथक तयार करण्यात आले.

Notorious thief arrested Naresh Bhange | कुख्यात चोर नरेश भांगेला अटक

कुख्यात चोर नरेश भांगेला अटक

Next
ठळक मुद्देचार घरफोड्यांची कबुली : सोन्या-चांदीसह एक लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : १२ बिगर जमानती वॉरंट निघालेला कुख्यात चोर नरेश समाधान भांगे याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गाडगेनगर हद्दीतील रिंगरोडवरून अटक केली. त्याने घरफोडींची कबुली दिली असून, त्याच्याजवळून ४३ गॅ्रम वजनाचे सोने, १० गॅ्रमची चांदी, ६०० रुपये असा एकूण एक लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गेल्या वर्षात शहरात घरफोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी गुन्ह्यांचा छडा लावण्याचे निर्देश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, यशवंत सोळंके, शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस आयुक्त बी.डी. डाखोरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राम गिते यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई विकास रायबोले, जावेद अहेमद, अजय मिश्रा, दिनेश नांदे, मोहम्मद सुलतान, निवृत्ती काकडे, चालक प्रशांत नेवारे यांचे पथक तयार करण्यात आले. नव्या वर्षात पहिल्याच दिवशी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडीतील आरोपीला अटक केली. १ जानेवारी रोजी गुन्हे शाखेचे पोलीस रिंंगरोडवर गस्तीवर होते. दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी नरेश समाधान भांगे (३२, रा. अनकवाडी) हा राजपूत ढाब्याजवळ फिरताना दिस्ून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ घरफोडीचे साहित्य पेचकस आढळून आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने घरफोडीची कबुली दिली.
गाडगेनगरच्या गुन्ह्यात नरेश भांगे याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती. त्यानुसार न्यायालायने त्याला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नरेश भांगे हा घरफोड्या करणारा कुख्यात आरोपी असून, त्याच्याकडून आणखी घरफोड्यांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस पथक प्रयत्न करीत आहेत.

जिल्ह्याबाहेरही घरफोड्या
नरेश भांगे हा अनेक दिवसांपासून फरार होता. खुनासारखे गंभीर गुन्हे नरेशविरुद्ध दाखल आहे. त्याच्याविरुद्ध १२ वॉरंट निघाले आहेत. अमरावतीत ३० गुन्ह्यांसह चंद्रपूरातही गुन्हे दाखल आहेत. त्याने चार घरफोड्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Notorious thief arrested Naresh Bhange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर