शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

संजय गांधीनगर हटविण्यासाठी नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 11:16 PM

राज्य शासनाने वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येथील जुन्या बायपासलगतच्या संजय गांधीनगर क्रमांक २ नागरी वस्ती वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित आहे.

अमरावती : राज्य शासनाने वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येथील जुन्या बायपासलगतच्या संजय गांधीनगर क्रमांक २ नागरी वस्ती वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित आहे. सन १९८२ पासून वनजमिनीवर मौजा वनखंड क्रमांक जुना १८६ सर्व्हे नंबर ८४, ‘क’ वर्ग राखीव वनजमिनींवर अतिक्रमण करून घरे बांधल्याचे वनविभागाने नोटीशीद्वारे म्हटले आहे. भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१) ग, ई, फ, चा भंग केल्यामुळे संजय गांधीनगरात २७९ अतिक्रमित धारकांविरुद्ध यापूर्वीच वनगुन्हे दाखल झाले आहे. राखीव वनक्षेत्र असल्याने शासन आदेशानुसार सात दिवसांत घरे हटविण्यात यावीत, अन्यथा शासकीय बळाचा वापर करून नियमानुसार अतिक्रमित घरे हटविली जातील, असे नोटीशीत स्पष्ट नमूद आहे. नैसर्गिक न्यायाचा विचार करून स्वत:चे अतिक्रमण स्वत: काढण्यासाठी एक संधी दिली जात असून सात दिवसांत हटविण्यात आले नाही तर भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१ए) (बी) प्राप्त अधिकारान्वये सरकारजमा करण्याची कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे नोटिसाद्वारे वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी स्थानिक रहिवाशांना ‘अल्टिमेटम’ दिला आहे.संजय गांधीनगर हे वनजमिनींवर वसलेले असून गरीब, सामान्यांची नागरी वस्ती असल्याने ती रीतसर नियमित करून न्याय प्रदान करावा, अशी मागणी नगरसेवक अजय गोंडाणे यांनी यापूर्वी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केली आहे. एवढेच नव्हे, तर आ. सुनील देशमुख यांनीदेखील शासनाकडे मानवतेचा दृष्टिकोन ठेवून संजय गांधीनगर क्रमांक २ या नागरी वस्तीला संरक्षण प्रदान करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.हजारापेक्षा अधिक घरेवनविभागाच्या नोंदी संजय गांधीनगरात अतिक्रमित २७९ एवढीच घरे असली तरी हजारपेक्षा अधिक घरे तेथे असतील, असा अंदाज आहे. या भागात बहुतांश गरीब, सामान्य, कामगार कुटुंब अधिक संख्येने वास्तव्यास आहेत.जिल्हाधिकाºयांना साकडेवनविभागाने सात दिवसांत घरे हटविण्याबाबत नोटिसा बजावताच गुरुवारी संजय गांधीनगर नं. २ येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना घरे वाचविण्यासाठी निवेदनाद्वारे साकडे घातले. जिल्हाधिकाºयांनी कैफियत ऐकली. याबाबत शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला जाईल, असे त्यांनी निवेदनकर्त्यांना सांगितले.रमाई आवास योजनेचा लाभसंजय गांधीनगरात लाभार्थ्यांनी राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे वनविभागाच्या कारवाईने अतिक्रमणासह घरकुलदेखील हटविले जातील.