शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

सुट्या पैशांचे टेन्शनच नाही; मोबाईलने काढा लाल परीचे तिकिट

By जितेंद्र दखने | Updated: July 15, 2023 20:26 IST

विभागात १०५८ अँड्राईड तिकीट मशीन दाखल : वाहक झाले स्मार्ट

अमरावती : एसटीच्या ईटीआयएम मशीनमध्ये वारंवार होणारे बिघाड, सुट्या पैशांवरून प्रवासी व वाहकांमधील तू-तू मै-मै आता इतिहासजमा होतील. कारण लाल परीमध्ये महामंडळामार्फत अमरावती विभागातील आठ आगारांमध्ये १०५८ अँड्राईड तिकीट मशीन उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे वाहकही स्मार्ट झाले असून खिशात रोख पैसे नसतानाही एसटीतील प्रवाशांना आता आपल्या मोबाईलवरील गुगल -पे, फोन पे, कार्ड पेमेंटच्या माध्यमातून डिजिटल तिकीट काढता येणार आहे.

सदोष मशीनमुळे अनेकदा एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी असताना कोऱ्या कागदावर तिकीट लिहून देण्याची वेळ वाहकांवर येते हाेती. त्यामुळे महामंडळानेही वाहकांच्या डोक्याला तापदायक ठरलेल्या या यंत्रांना बायबाय करून अँड्राईड ई-तिकीट मशीन आणल्या. जिल्ह्यातील सर्वच आगारातील वाहकांना या मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. आधुनिक अँड्राईड ई-तिकीट मशीनमुळे लाल परीचे वाहक हायटेक झाले आहेत. एसटीमधील गर्दी लक्षात घेता प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळणार आहेत.

आगारनिहाय अशा मिळाल्या मशीनविभागातील अमरावती आगाराला १६७, बडनेरा १११, चांदूर बाजार ११३, चांदूर रेल्वे १०९, दर्यापूर १४८, मोर्शी १०४, परतवाडा १६३, वरूड १४३ अशा एकूण १ हजार ५८ आधुनिक अँड्राईड ई-तिकीट मशीन उपलब्ध झाल्या आहेत. याबाबत आगारस्तरावर वाहकांचे प्रशिक्षण झाले. नवीन अँड्राईड ई-तिकीट मशीन ही चार्जर व मशीन कव्हरसह पुरविण्यात आली आहेत.

अमरावती विभागातील आठ आगारांकरिता १०५८ नवीन अँड्राईड ई-तिकीट मशीन प्राप्त झाल्या आहेत. येत्या आठवड्यात प्रवाशांना आपल्या मोबाईलवरील गुगल-पे, फोन पे, कार्ड पेमेंटच्या माध्यमातून या मशीनद्वारे प्रवासाचे भाडे चुकविता येईल तसेच याच डिव्हाइसमधून सुटे पैसे दिल्यास डिजिटल तिकीटदेखील काढता येईल.- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक

टॅग्स :state transportएसटी