शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बँकांचे असहकार्य : पश्चिम विदर्भात खरिपाचे २७ टक्केच कर्जवाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 17:26 IST

पश्चिम विदर्भात सलग चार वर्षे दुष्काळ व नापिकीने शेतकरी आर्थिक संकटात असताना पीक कर्जवाटपासाठी बँकादेखील माघारी पाठवित असल्याचे चित्र आहे.

अमरावती  - पश्चिम विदर्भात सलग चार वर्षे दुष्काळ व नापिकीने शेतकरी आर्थिक संकटात असताना पीक कर्जवाटपासाठी बँकादेखील माघारी पाठवित असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाला दोन महिने झाले असतानाही पीक कर्जवाटपाचा टक्का २७ वरच रखडलेला आहे. शासन व जिल्हा प्रशासनाने वारंवार तंबी दिल्यावरही बँका जुमानत नसल्याने या बँकावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकºयांचा सवाल आहे. यंदाच्या खरिपासाठी विभागात ३२ लाख ३१ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. पावसाने सुरुवातीपासून दडी मारल्याने किमान चार लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना पीककर्ज वाटपासाठी बँकांचा टक्का वाढलेला नाही. यंदाच्या हंगामात अमरावती विभागातील बँकांना खरिपासाठी ८५४९ कोटी ३२ लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ३ लाख ५ हजार ९५० शेतकºयांना २ लाख ४० हजार ६८० हेक्टर क्षेत्रासाठी २३६० कोटी चार लाखांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. दर आठवड्यात एक टक्का वाटप अशी बँकांची गती राहिली आहे. शेतक-यांसह लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी खरिपाच्या कर्जवाटपाचा आढावा घेतला. जिल्हाधिका-यांनी दर आठवड्यात कर्जवाटपाच्या आढावा सभा घेतल्या, मात्र, बँकांवर शासन-प्रशासनाच्या तंबीचा कोणताच परिणाम झालेला नाही, असे दिसून येते.विभागात जिल्हा सहकारी बँकांनी ४३ टक्के कर्जवाटप केल्यामुळे वाटपाची सरासरी वाढली आहे. जिल्हा बँकांना २३०५ कोटी ६९ लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ९९१ कोटी ५३ लाखांचे कर्जवाटप केल्यामुळेच कर्जवाटपाची सरासरी वाढली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ५४११ कोटी तीन लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असतांना आतापर्यत १२२५ कोटी ४७ लाखांचे वाटप झाले आहे. ही २२ टक्केवारी आहे, तर ग्रामीण बँकांना ८३२ कोटी ५८ लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ११९ तीन लाखांचे कर्जवाटप केले आहे. ही १४.३० टक्केवारी आहे. दर आठवड्याला एक टक्का अशी गती गृहीत धरल्यास यंदाच्या हंगामात कर्ज वाटपाचा ३५ टक्क्यांच्या आत राहणार, हे वास्तव आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रVidarbhaविदर्भ