शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

महाविद्यालय परिसरात ‘नो टोबॅको’, विद्यापीठांनाही सक्तीचे निर्देश  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 6:02 PM

प्राथमिक व माध्यमिक शाळांपाठोपाठ महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखुमुक्त करण्याचा संकल्प शासनाने सोडला आहे.

अमरावती : प्राथमिक व माध्यमिक शाळांपाठोपाठ महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखुमुक्त करण्याचा संकल्प शासनाने सोडला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील विद्यापीठांनाही तंबाखुमुक्तीचे निर्देश दिले आहेत. शाळा-महाविद्यालय परिसर तंबाखुमुक्त करण्यासाठी १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्री होत असल्यास संबंधित शैक्षणिक संस्थांना पोलिसंकडे तक्रार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. 

तंबाखू वापरावर प्रभावी नियंत्रणासाठी केंद्र शासनाने सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ केला आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तंबाखूच्या विळख्यात सापडू नयेत, यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अधिनस्थ संस्थांना निर्देश दिले आहेत.  राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांचा परिसर तंबाखुमुक्त करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालय, शैक्षणिक संस्थानात धूम्रमान बंदीबाबत सूचना फलक लावण्यात यावा, धूम्रपान करताना अथवा तंबाखू खाताना दिसल्यास तक्रार कुणाकडे द्यावी याबाबतच्या माहितीचा फलक लावण्यात यावा, महाविद्यालयाच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीबंदीबाबतचे फलक प्रवेशद्वारावर लावावेत तसेच १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास संस्थाप्रमुखांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संस्थाप्रमुखांनी संस्थेच्या आवाराची तपासणी करून, संस्था आवारात कुठलीही तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध नाहीत. याबाबतचा अहवाल संबंधित शिक्षण संचालकांना द्यावा लागणार आहे. 

तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ ची महत्त्वाची कलमेकलम ४ : शैक्षणिक संस्थांसह सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे.कलम ६ (अ) : तंबाखू विक्री लहान मुलांना आणि लहान मुलांकडून करून घेण्यास बंदी आहे. कलम ६ (ब) : शैक्षणिक संस्थांपासून १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्रीस बंदी आहे व तसे शाळेच्या प्रवेशद्वारावर फलक लावणे बंधनकारक आहे.वरील नियमांचे पालन न केल्यास २०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

टॅग्स :universityविद्यापीठ