शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

भाषण नको, अ‍ॅक्शन हवी

By admin | Updated: June 23, 2016 00:02 IST

शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना तत्काळ पीक कर्ज मिळायला पाहिजे. यातील तीन बैठकी घेतल्या आता वाटपाच्या टक्केवारीचे कागदी घोडे नाचवू नका,...

पालकमंत्री : जून अखेरपर्यंत १०० टक्के पीक कर्ज वाटपाचे निर्देशअमरावती : शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना तत्काळ पीक कर्ज मिळायला पाहिजे. यातील तीन बैठकी घेतल्या आता वाटपाच्या टक्केवारीचे कागदी घोडे नाचवू नका, बैठकीत नेहमीचे तुमचे भाषण नको, आता फक्त अ‍ॅक्शन पाहिजे दिलेले कर्जवाटपाचे ‘टार्गेट’ मुदतीच्या आत पूर्ण झाले पाहिजे, अशी तंबी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी बचत भवन येथे आयोजित पीक कर्ज वाटपाच्या आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिली.सर्वच बैठकांविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांची विनाकारण अडवणूक केली जाते. त्यांना उद्धटपणाची वागणूक दिली जाते. वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्याकडून रक्कम उकळल्या जाते, हे सर्व प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जवाटप करण्याचे राज्याच्या मुख्यमंत्र्याचे आदेश आहेत. या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहीजे, ज्या बँका मुदतीच्या आत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करु शकणार नाही. त्यांनी आपल्या या बैठकीत स्पष्टपणे सांगावे त्यांचा तसा अहवाल मुख्यमंत्र्यांना देऊ मात्र, शेतकरी बँॅकात येत नाही अश्या खोटया सबबी आता सांगू नका, आपण सर्व शेतकऱ्यांची मुले आहात शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम झाले पाहिजे. शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप व पुनर्गठन ३० जूनच्या आत झाले पाहिजे, असे पालकमंत्र्यानी निक्षून सांगितले.यंदाच्या खरीपासाठी १७५९ कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. यापैकी ९४० कोटी रुपयांचे कर्जवाटप सद्य:स्थितीत झाले आहे. पीक कर्ज वाटपाची ही ५३ टक्केवारी आहेत. यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३१७ कोटी, राष्ट्रीयकृत बँकांनी ६२३ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. अजून २ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना पीक अजून ८१९ कोटी कर्जवाटप करायचे आहे. पुनर्र्गठनासाठी जिल्ह्यात ७१ हजार २२९ शेतकरी पात्र आहेत. त्यापैकी ४३ हजार ७२९ शेतकऱ्यांचे पुनर्गठन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी दिली. जिल्हा उपनिंबधक गौतम वालदे, सुनील रामटेके आदी उपस्थित होते.कर्जातून कुठल्याही शुल्काची कपात नकोस्टेट बँक व बँक आॅफ महाराष्ट्र या बँका शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून प्रक्रिया शुल्क वसूल करुन कर्जात विम्याची रक्कम चढवित आहेत. शासनाने प्रक्रिया शुल्क रद्द केले आहे. शासनाचा कृषी पीक विमा असताना तूम्ही तुमचा पीक विमा शेतकऱ्यांवर लावू नका, असे पालकमंत्री म्हणाले.ही धमकी समजायची असले तर समजादेना बॅकेच्या व्यवस्थापकाविषयी अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मुख्यमंत्र्यांना आधी काही समजत नाही, असे उर्मट बोलल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या बँकेनी केवळ ११ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. शुक्रवारच्या आत १५ कोटीचे कर्जवाटप झालेच पाहीजे. याला तुम्ही धमकी समजा असेल तर समजा? असे पालकमंत्र्याची दरडाऊन सांगितले.शेतकऱ्यांच्या तक्रारीचा वाचला पाढाजिल्हा बँकेसह सेट्रल बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, देना बँक, आदी बँक संदर्भात शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारीचा पाढा पालकमंत्र्यानी वाचून दाखविला, शेतकऱ्यांना बँकेतून हाकलून दिल्याच्या तक्रारीमुळे पालकमंत्री संतापले.