शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयात ना साबण, ना सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:01 IST

मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या सोईसुविधेसाठी सीईओंच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक पदाधिकारी तसेच विभागाच्या मुख्यप्रवेशव्दारा बाजूलाच कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर व हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून दिले. सुरूवातीला या सर्व सोई-सुविधा नित्यनेमाने उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देटाक्यांमध्ये पाणीही नाही : सांगा, कशी होणार हातांची स्वच्छता ?

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हात स्वच्छ धुवा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारा केले जात आहे. कोरोनाचा संसर्गाचा फैलाव होवू नये, यासाठी सामान्य प्रशासन विभागाने जिल्हा परिषदेत नऊ ठिकाणी कर्मचाऱ्यांना हात धुतल्यानंतरच प्रवेश देण्यात येत होता. मात्र, बुधवारी स्वच्छतेसाठी ठेवण्यात आलेल्या सोई सुविधाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आढळून आले.अनेक विभागासमोर कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी पाणी भरलेले ड्रम ठेवण्यात आले. मात्र यात काही ठिकाणी पाण्याचा थेंबही नव्हता तर काही ठिकाणी पाणी होते तर ना साबण, ना सॅनिटायझर अशी स्थिती होती. त्यामुळे नुसते पाण्याने हात धुतल्याने कोरोनाचा संसर्ग रोखता येईल का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाºया नागरिकांच्या सोईसुविधेसाठी सीईओंच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक पदाधिकारी तसेच विभागाच्या मुख्यप्रवेशव्दारा बाजूलाच कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर व हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून दिले. सुरूवातीला या सर्व सोई-सुविधा नित्यनेमाने उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आता मात्र, कोरोना संकट वाढत असतांना या सुविधाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे चित्र मिनीमंत्रालयात दिसून येत आहे.मुख्यालयातील विविध विभागांच्या प्रवेशद्वारावरच ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येथे कर्मचाऱ्यांना हात धुतल्यानंतर कार्यालयात प्रवेश दिला जात होता. बाहेरून शासकीय कामांचे टपाल घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याने हात धुतल्याशिवाय ते स्वीकारले जात नसल्याचे चित्र जिल्हा परिषदेत दिसत होते. मात्र, कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असतांनाच या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव आहे.अधिकारी व पदाधिकारी याकडे लक्ष देणार का, अशी विचारणा होत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या