शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

हौसेला मोल नाही, पसंतीच्या क्रमांकासाठी मोजले ७७ कोटी, ९९ हजार वाहनधारकांनी मिळविला चॉइस नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 18:04 IST

वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे. राज्यातील ९९ हजारांवर वाहनधारकांनी पाच हजार ते तब्बल अडीच लाख रुपये भरून हे ‘चॉइस नंबर’ मिळविले आहेत.

- प्रदीप भाकरे 

अमरावती :  वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे. राज्यातील ९९ हजारांवर वाहनधारकांनी पाच हजार ते तब्बल अडीच लाख रुपये भरून हे ‘चॉइस नंबर’ मिळविले आहेत. त्यातील १७ जणांनी तर अडीच लाख रुपये किंमत असलेले क्रमांक ७१ लाखांना मिळविले. २३.४५ कोटी रुपये महसूल मिळवून पुणे विभाग यामध्ये अव्वल ठरला आहे.वाहनधारकांच्या विशिष्ट क्रमांकावर पडणा-या उड्या लक्षात घेऊन आरटीओनेही त्यातून महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले. हौशी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्याअनुषंगाने आरटीओने ०१ व ९९९९  या क्रमांकासह ०७८६, १११, ४४४, ५५५ असे विविध चॉइस नंबर उपलब्ध केले. ०००१ या क्रमांकासाठी तर अडीच ते तीन लाख रुपये आकारणी केली जाते. पाच हजारापासून ते अडीच लाख रुपयांच्या पुढे हे क्रमांक उपलब्ध आहेत. आरटीओने ही नोंदणी आॅनलाइनदेखील केली आहे. एप्रिल ते ३० आॅक्टोबर २०१७ या कालावधीत पसंतीच्या वाहनक्रमांकातून आरटीओच्या १२ विभागीय कार्यालयांना ७७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. राज्यातील ९९ हजार वाहनधारकांनी पसंतीचे क्रमांक मिळविले. ६७ हजार वाहनधारक पाच हजारी राज्यातील ६७,६५७ वाहनधारकांनी प्रत्येकी पाच हजार रुपये भरून पसंतीचे क्रमांक मिळविले. त्यातून आरटीओला २८.५३ कोटी रुपये महसूल मिळविले. १६,९१० वाहनधारकांनी ५ ते ७ हजार रुपये किंमत असलेले पसंती क्रमांक मिळविलेत. ७५०१ ते १० हजार रुपये किंमत असलेले क्रमांक मिळवून १६०२ वाहनधारकांनी आरटीओच्या तिजोरीत १.६० कोटींची भर घातली. १० ते २० हजार किमतीचे क्रमांक ६१३३ वाहनधारकांनी मिळविले. त्यातून आरटीओला ८.८६ कोटी रुपये प्राप्त झालेत. २० ते ५० हजार रुपये प्रत्येकी भरून ६,०३२ वाहनधारकांनी, तर ५० हजार ते एक लाख रुपये किमतीचे क्रमांक मिळवून २६७ जणांनी १.९१ कोटी रुपये खर्च केलेत. ३११ वाहनधारकांनी १ लाख ते अडीच लाख रुपये किमतीचे पसंतीचे क्रमांक मिळविलेत. त्यातून आरटीओला ४.९२ कोटींचा महसूल मिळाला.

विभागनिहाय मिळालेला महसूल (कोटीत) विभाग            प्रकरणे      महसूल बृहन्मुंबई         ६६५२        ६.०८ ठाणे              १०७४४      ९.९८ पनवेल           ३८०१        २.७१ कोल्हापूर      १०६११         ७.३० पुणे              ३०३६६      २३.४५ नाशिक        २७५४५       १९.५९ धुळे                ८३७         ०.५८ औरंगाबाद      ३५७२       २.८० लातूर          ३१०               ०.३० नांदेड         १२८१            १.०६ अमरावती    १२९७          १.०७ नागपूर        १५६२      १.१३

टॅग्स :AmravatiअमरावतीRto officeआरटीओ ऑफीस