शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या आरक्षित डब्यात ना मास्क,ना सोशल डिस्टंसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST

बड़नेरा : (श्यामकांत सहस्त्रभोजने) रेल्वे गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करतात. सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाने रुग्ण पछाडले आहेत. रेल्वेच्या ...

बड़नेरा : (श्यामकांत सहस्त्रभोजने)

रेल्वे गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करतात. सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाने रुग्ण पछाडले आहेत. रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये ना मास्क,ना सोशल डिस्टंसिंगचे चित्र नक्कीच कोरोणा संसर्गात वाढ करणारे आहे. याची रेल्वे प्रशासनाला गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे. दंडात्मक कारवाई करणारे स्वतंत्र पथक केव्हा नेमणार, हा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

अमरावती जिल्ह्यात काही दिवसात कोरोना संसर्गाने चांगलेच तोंड वर काढले आहे. रुग्णांची संख्या ६०० च्या वरच आहे. संसर्ग जिल्ह्यासाठी चिंतेची बाब ठरते आहे. जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. मात्र, रेल्वे प्रवासात प्रवाशांमध्ये सोशल डिस्टंसिंगचा असलेला अभाव तसेच बहुतांश प्रवासी मास्कविनाच प्रवास करीत असल्याचे चित्र कोरोना संसर्गात नक्कीच भर पाडणारे आहे बडनेरा रेल्वे स्थानकावरून ६० ते ६५ रेल्वे प्रवासी गाड्या धावतात शेकडो प्रवासी प्रवास करीत आहे गाड्यांमध्ये अधिकतर प्रवासी त्याच्याकडील मास्कचा वापरच करीत नसल्याचे दिसून पडते आहे. हनुवटीवर मास्क ठेवतो आहे. लहान मुले मास्क विनाच डब्यांमध्ये फिरत आहे. आरक्षित डब्यांमध्ये जवळपास एका डब्यात ७४ प्रवासी बसण्याची व्यवस्था आहे एका कंपार्टमेंटमध्ये सहा प्रवासी बसतात त्यामुळे सोशल डिस्टंसिंग कसे पाळल्या जाते हा प्रश्नच आहे. जवळपास रेल्वे गाड्यांमध्ये एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येते सहाजिकच प्रवाशांचा एकमेकांशी संपर्क येतो रेल्वे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन विशेष पथक कारवाईसाठी तयार केले पाहिजे कोरोनाचा संसर्ग रेल्वे प्रवाशांमधूनदेखील वाढू शकतो हे एकूणच चित्रांवरून नाकारता येणार नाही. रेल्वे गाड्यांमधील टीटी व आरपीएफचे कर्मचारी त्यांच्या कामासोबतच मास्क तसेच सोशल डिस्टंसिंगवर लक्ष ठेवत असल्याचे समजले. अधिकृतपणे मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांने कुठलीही माहिती देण्याचे टाळले रेल्वे गाड्या मध्ये आपली ड्युटी बजावणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील संसर्गाचा त्रास होऊ शकतो.

"""""""""""""""""""""''''"""""

जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे

* अमरावती- मुंबई एक्सप्रेस

* विदर्भ एक्सप्रेस

* गीतांजली एक्सप्रेस

* महाराष्ट्र एक्सप्रेस

* अमरावती- तिरुपती

* हावडा- मेल

* अहमदाबाद- पुरी

"""""""'''''''''''''"""""""""""""""

बॉक्स

बडनेरा रेल्वे स्थानकावरून विविध मार्गांकड़े आठवडाभरात सद्यस्थितीत जवळपास ६५ रेल्वे गाड्या धावत असल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यात जाणाऱ्यादेखील गाड्या आहेत. जिल्ह्यात बडनेरा रेल्वे स्थानक जंक्शन असल्याने येथून मोठ्या संख्येत रेल्वे गाड्या धावतात प्रवासी संख्यादेखील मोठी असते.

”""""""""""""""""""""""'''''''''''''""""

बॉक्स:

विनामास्कवर कारवाईच नाही

रेल्वे प्रवासात अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये विना मास्क तसेच कोरोना संसर्गाचे नियम न पाळणाऱ्या प्रवाशांवर अद्याप कुठलीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच अशा प्रवाशांवर धावत्या रेल्वेगाडीत नियंत्रण ठेवणारे पथकदेखील नसल्याचे समजते दंडाची कारवाई नसल्याने रेल्वे गाड्यांमधील अधिकतर प्रवासी बिनधास्त मास्कविनाच प्रवास करीत आहे. याचा मात्र नियम पाळणाऱ्या प्रवाशांना कोरोना संसर्गाचा धोका निश्चितच वाढणारा आहे. जिल्ह्यात संसर्गाचा वाढता प्रकोप पाहता रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ स्तरावर प्रकर्षाने दखल घेणे तेवढेच गरजेचे झाले आहे. रुळावर असणारी रेल्वे पुन्हा बंद पडू नये, असे सर्वांच्याच मनातली बाब आहे.